नवी दिल्ली, 5 जुलै : लोभ हा खूप वाईट असतो. हे वारंवार सांगूनही अनेकजण नको तिथे लोभ दाखवून आपल्या हातातील चांगली संधी गमावतात. ही गोष्ट लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि प्राण्यांच्या बाबतीतही आहे. प्राणीही अनेकवेळा लोभापोटी चांगली घडत असलेली गोष्ट गमावून बसतात. अशा अनेक घटना आत्तापर्यंत समोर आल्या आहेत. असाच आणखी एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये बिबट्याचा लोभ त्यालाच महागात पडतो. लोभामुळे बिबट्या त्याच्या तोंडातील शिकार गमावून बसतो. याचा एक व्हिडीओ समोर आलाय जो सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधत आहे. यावरुन लोभ किती वाईट आहे याचा तुम्हाला अंदाज येईलच.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बिबट्या रस्त्यावर रानडुक्कराची शिकार करतो. तो ते रानडुक्कर तोंडात घेऊन निघतोच त्याला अजून एक रानडुक्कर दिसतं. त्याला पाहून तो तोंडातील शिकार केलेलं रानडुक्कर सोडतो आणि दुसऱ्या रानडुक्कराच्या मागे धाव घेतो. ते तेथून धूम ठोकून पळून जातं आणि मागे फिरल्यावर ज्याती शिकार केली होती तेही निसटून गेलं. त्यामुळे अतिलोभाच्या पायी बिबट्याच्या हाती काहीच लागलं नाही.
This leopard forgot the golden principle-a bird in the hand is worth two in the bush😊😊 pic.twitter.com/KwQUKlRzia
— Susanta Nanda (@susantananda3) July 3, 2023
हे संपूर्ण दृश्य तेथे कारमध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तीनं शूट केलं आहे. भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी सुसंता नंदा यांनी @susantananda3 त्यांच्या ट्विटर आयडीवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. 12 सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होतोय. व्हिडीओवर अनेक कमेंट येताना दिसत आहे. लोक लोभ चांगला नसल्याचं सांगत आहेत. दरम्यान, असे अनेक व्हिडीओ यापूर्वीही सोशल मीडियावर समोर आले आहेत. अशा घटना माणसांसोबतही घडतात. लोभामुळे लोकांना खूप काही गमवावं लागतं.