Home /News /viral /

'या' माशात अडकलाय सर्वांचा जीव! ग्राहक 3 लाख देतायेत तरी मालक काही विकायला तयार नाही

'या' माशात अडकलाय सर्वांचा जीव! ग्राहक 3 लाख देतायेत तरी मालक काही विकायला तयार नाही

या माशाला मिळवण्यासाठी सर्वांची धडपड सुरू आहे.

लखनऊ, 11 डिसेंबर :  मासे तसे बहुतेकांना आवडतात. कुणाला खायला आवडतात तर कुणाला पाळायला म्हणजे घरातील पाण्याच्या टँकमध्ये ठेवायला. पण सध्या सोशल मीडियावर अशा एक मासा चर्चेत आला आहे, ज्याला मिळवण्यासाठी सर्वांची धडपड सुरू आहे. या एका माशासाठी (Fish) ग्राहक तब्बल 3 लाख रुपयेही द्यायला तयार आहेत. इतकी मोठी रक्कम मिळत असूनही या माशाचा मालक मात्र हा मासा विकायला तयार नाही. आता असं नेमकं या माशात काय खास आहे, असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. हा मासा उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बुलंदशहर येथील एका हिंदू (Hindu) व्यापाऱ्याकडील मस्त्यालयातील आहे. परंतु, हा मासा खरेदी करण्यासाठी अनेक मुस्लिम (Muslim) इच्छुक आहेत. त्यामुळे या माशाची किंमत लाखोंच्या घरात पोहोचली आहे. यामागील कारण समजलं तर तुम्ही देखील आश्चर्य व्यक्त कराल. हा काही साधा मासा नाही. हा मासा ऑस्कर (Oscar) जातीचा आहे. मात्र त्याची किंमत जास्त असण्यामागं एक खास कारण आहे. या माशाच्या शरीरावर एका बाजूला उर्दू भाषेत अल्लाह (Allah) तर दुसऱ्या बाजूला मोहम्मद (Mohammad) असं लिहिलेलं नैसर्गिक डिझाइन आहे. या कारणामुळे अनेक मुस्लिम बांधव हा मासा खरेदी करण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यास तयार आहेत. लोक या माशाला अल्लाहचं रुप मानत आहेत. या माशाचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. हे वाचा - धक्कादायक! स्वतःलाच जिवंत गिळताना दिसला महाकाय साप; कधीच पाहिला नसेल असा VIDEO या माशाचा मालक अंकुर हा ड्रायक्लिनर आहे. हा मासा खूप दिवसांपासून त्याच्याकडं असल्याचं अंकूर सांगतो. मात्र, हिंदू असल्यानं त्याला उर्दू लिहिता – वाचता येत नाही. त्यामुळे माशाच्या शरीरावर नेमकं काय लिहिलं आहे, हे त्याला माहिती नाही. त्यामुळे तो या खुणेला सामान्य समजत होता. याबाबत अंकुरनं सांगितलं की. "माझ्याकडे काम करत असलेल्या एका मुस्लिम कामगाराला मी या माशाविषयी सांगितलं. माशाच्या शरीरावर अल्लाह आणि मोहम्मद लिहिलं असल्याचं त्याने मला सांगितलं. यावर पहिल्यांदा माझा विश्वास बसला नाही. याबाबतची सत्यता पडताळण्यासाठी मी अनेक उर्दू जाणकारांना घेऊन आलो. मात्र, सर्व जाणकारांनी हिच गोष्ट सांगितल्यानंतर माझा त्यावर विश्वास बसला" हे वाचा - VIDEO - बेडुकही झालं फिटनेस फ्रीक; उड्यांसोबत आता हातात DUMBBELL घेऊन EXCERCISE "मी गेल्या 10 वर्षांपासून मस्त्यपालन करतो. ज्या माशाच्या शरीरावर अल्लाह असं लिहिलेलं आहे, तो मासा मी तीन वर्षापूर्वी खरेदी केला होता. सुरवातीला या माशाच्या शरीरावर केवळ छोट्या खूणा होत्या. परंतु, जसजसा हा मासा मोठा झाला तशा या खुणा अधिक स्पष्ट झाल्या. अनेक लोक माझ्या घरी मासा पाहण्यासाठी येत आहेत. तसेच माशासोबत सेल्फी देखील काढत आहेत. या माशाची चर्चा सुरु झाल्यानंतर त्याच्या खरेदीसाठी अनेकांनी माझ्याकडे विचारणा केली. काही मुस्लिम बांधवांनी या माशाची किंमत 3 लाख रुपये सांगितली. परंतु मी या माशाची विक्री करू इच्छित नाही.", असं अंकुरनं सांगितलं.
First published:

Tags: Festival, Fish, Muslim, Oscar, Religion, Social media, Uttar pradesh

पुढील बातम्या