मुंबई 01 जानेवारी : काही वन्य प्राणी खूप धोकादायक असतात, त्यांच्यापासून दूर राहणंच चांगलं असतं. अन्यथा तुम्ही त्यांच्या तावडीत सापडलात तर मृत्यू जवळपास निश्चित असतो. या धोकादायक प्राण्यांमध्ये सिंह, वाघ, बिबट्या, चित्ता आदींचा समावेश आहे. तसं त्यांना घाबरण्याची फारशी गरज नसते कारण ते जंगलात राहतात. मात्र, काहीवेळा ते जंगलातून बाहेर पडून अन्नाच्या शोधात मानवी भागात येतात आणि मग कहर होतो. कारमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात होतं अस्वल, अचानक असं काय झालं की प्राण्यानं ठोकली धूम? पाहा VIDEO अनेकदा हे जंगली प्राणी मानवी वस्तीत शिरतात आणि पाळीव प्राण्यांची शिकार करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. या व्हिडिओमध्ये सिंहिण एका पाळीव कुत्र्याची शिकार करताना दिसते, तेदेखील घरात घुसून. या पाळीव श्वानाला वाचवण्यासाठी कोणीही पुढे येत नाही, कारण सिंहिणीचा सामना करण्याची हिंमत कोणातच नसते.
एक दुसरा कुत्रा मात्र हिंमत दाखवतो आणि सिंहिणीजवळ जात तिच्या भुंकू लागतो. मात्र सिंहिणीवर याचा काहीच परिणाम होत नाही. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की सिंहिणीने कशाप्रकारे श्वानाचा गळा आपल्या जबड्यात पकडला आहे. यामुळे श्वान तडफडू लागतो आणि इच्छा असतानाही तो स्वतःची सुटका करू शकत नाही. व्हिडिओमध्ये दिसतं, की कोणीतरी सिंहिणीला तिथून पळून लावण्यासाठी एक काठीही फेकली मात्र तिच्यावर याचाही काही परिणाम झाला नाही. Social: झाडाच्या सावलीत झोपलेल्या वाघाची कुत्र्यानं मोडली झोप अन् अंगावर काटा आणणारा Video अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर beautiful_new_pix नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत 75 हजारहून अधिकांनी पाहिला आहे, तर हजारो जणांनी लाईकही केला आहे. अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत. यूजर्सचं म्हणणं आहे, की व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीने या श्वानाला सिंहिणीच्या तावडीतून वाचवायला हवं होतं. मात्र श्वानाला वाचवण्यासाठी कोणी स्वतःचा जीव कोण धोक्यात घालेल.