नवी दिल्ली, 31 डिसेंबर : प्राण्यांच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी सिंह आणि वाघ एकमेकांना भिडतात, तर कधी इतर कोणते प्राणी. बऱ्याचदा बरोबरीच्या प्राण्यांमध्ये प्रतिष्ठेसाठी लढाई होताना दिसते. पण आम्ही तुम्हाला सांगितलं की एक कुत्रा आणि वाघ एकमेकांना भिडले तर, तुमचा विश्वास बसेल का? कदाचित बसणार नाही. पण हे खरंय. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत वाघ आणि कुत्र्याची लढाई पाहायला मिळत आहे. याबद्दल ‘रिपब्लिक वर्ल्ड’ने वृत्त दिलंय. या व्हिडिओमध्ये एक कुत्रा आपल्यापेक्षा कैकपटींनी बलवान असलेल्या वाघाला आव्हान देतो आणि मग तो वाघाचं भक्ष्य ठरतो. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक वाघ झाडाखाली आराम करताना दिसत आहे. तिथूनच एक कुत्रा जात असतो, झोपलेल्या वाघाला पाहून कुत्रा भुंकायला लागतो. समोर वाघ असूनही कुत्रा त्याच्याकडे बघून गुरगुरतो आणि आव्हान देण्याचा प्रयत्न करतो. नंतर वाघ तिथून उठतो आणि कुत्र्याकडे धावतो. त्यावर तो कुत्रा वाघाला न घाबरता आणि तिथून पळून न जाता त्याच्यावर भुंकत असतो. पण कुत्र्याने कितीही प्रयत्न केले तरी त्याचं वाघासमोर टिकणं शक्यच नाही. त्यानंतर अगदी काही सेकंदात वाघ कुत्र्याची शिकार करतो. आजीला घेऊन चिमुकल्यानं पळवली वाऱ्याच्या वेगानं बाईक आणि… व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल खरं तर, कुत्रा तिथून शांतपणे निघून गेला असता, तर त्याचा जीव वाचला असता, पण त्याला वाघाची छेड काढणं आणि त्याच्यावर भूंकणं चांगलंच महागात पडलं असं या व्हिडिओवरून दिसतं. कारण त्याने भुंकल्यावर वाघाने त्याची शिकार केली. कुत्र्याला मारल्यानंतर वाघ त्याला तोंडात धरून जंगलाच्या दिशेने चालत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. IRS अधिकारी अंकुर रापरिया यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ राजस्थानमधील आहे. झोपलेल्या वाघाला इतकं कमी लेखू नका. रणथंबोरमधील किलिंग मशीनमधील T120 वाघाने अगदी बिबट्या, अस्वल आणि हायनालादेखील मारलंय, असं कॅप्शन रापरिया यांनी या व्हिडिओला दिलंय. हा व्हिडिओ लोक मोठ्या प्रमाणात रिट्विट करत असून वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.