जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Video : पिंजऱ्यात तरुणाची एन्ट्री होताच सिंहिणीचा हल्ला, पुढे घडलेला प्रकार हृदयाचे ठोके चुकवणारा

Video : पिंजऱ्यात तरुणाची एन्ट्री होताच सिंहिणीचा हल्ला, पुढे घडलेला प्रकार हृदयाचे ठोके चुकवणारा

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

ही व्यक्ती सिंहिणीला पाहून पुढे-मागे धावण्याचा प्रयत्न करते आणि सिंहीण ज्या प्रकारे त्याचा पाठलाग करते, ते दृश्य खरोखरच धक्कादायक आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 09 मे : सिंह हा जंगलाचा राजा आहे. त्याचं नुसतं नाव जरी घेतलं तरी अनेकांना घाम फुटतो. सिंहाला पाहून प्राणी देखील लांब पळतात. कारण त्याने जर एखाद्याची शिकार करण्याचं ठरवलं तर मात्र त्याचं काही खरं नाही. सिंहाशी संबंधीत अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल. खरंतर वन्यप्राण्यांना राग आला तर ते कसलाच विचार करत नाही. हा व्हिडीओ देखील अशाच घटनेशी संबंधीत आहे. खरंतर एक व्यक्ती चुकून सिंहाच्या पिंजऱ्यात आली आणि तेथे पोहोचताच सिंहिणी त्याच्याजवळ आल्या आणि त्यांनी या व्यक्तीवर हल्ला केला. व्हिडीओमध्ये पुढे दिसणारे दृश्य तुमचे हृदय हेलावू शकते. कमकुवत हृदयाच्या लोकांनी हा व्हिडीओ पाहू नका. वासराला वाघ पकडणार इतक्यात गायीची एन्ट्री, 10 सेकंदात पलटला संपूर्ण गेम, पाहा Video इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक माणूस सिंहीणीच्या पिंजऱ्यात धावताना दिसत आहे. सिंहीण त्याच्या मागे धावत आहे. ही व्यक्ती सिंहिणीला पाहून पुढे-मागे धावण्याचा प्रयत्न करते आणि सिंहीण ज्या प्रकारे त्याचा पाठलाग करते, ते दृश्य खरोखरच धक्कादायक आहे.

जाहिरात

त्या व्यक्तीला सिंहिणी पकडे आणि त्याच्यावर हल्ला करते. सिंहिण त्या व्यक्तीचे लचके तोडू पाहाते. पण तेवढ्यात आणखी एक व्यक्ती पिंजऱ्यात येते. जी सिंहिणीला या व्यक्तीपासून लांब करते. ज्यानंतर सिंहिण लांब देखील होतात. सिंहिणीला लांब जाताना पाहून ही व्यक्ती सुटकेचा श्वास घेते. असा कोणता देश आहे जो पृथ्वीच्या मध्यावर आहे? 99 टक्के लोकांना माहित नाही याचं उत्तर हे दृश्य पाहून वाटते की व्हिडीओमधील दुसरी व्यक्ती या सिंहिणींचा सांभाळ करणारा व्यक्ती असावा, ज्यामुळे त्याने लांब करतात सिंहिंणी लांब देखील झाल्या. zahidkhizar786 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला 4 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. लोक हा व्हिडीओ पाहून थक्क झाले आहेत. अनेकांचं म्हणणं आहे की जर दुसरी व्यक्ती तिथे आली नसती तर ती व्यक्ती जिवंत देखील राहिली नसती आणि ते खरं देखील आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात