मुंबई, 07 मे : आम्ही तुमच्यासाठी काही असे प्रश्न घेऊन आलो आहेत, ज्याचं उत्तर देताना तुम्हाला घाम फुटेल. तसे पाहाता अभ्यास केला असेल तर याची उत्तर सोपी आहे. स्पर्धा परिक्षा दिलेले किंवा तयारी करत असलेल्या लोकांना कदाचित याचं उत्तर माहिती असेल. त्या व्यतिरिक्त फार कमी असे लोक असतील जे यांची उत्तरे सांगू शकतील. तर चला काही प्रश्न आणि त्याची उत्तर जाणून घेऊ जे तुमच्या ज्ञानात भर टाकायला मदत करतील. प्रश्न: भारतीय राज्यघटनेत पहिली दुरुस्ती केव्हा करण्यात आली? उत्तर: 1951 प्रश्न: भारताची प्रमाणित कालरेषा काय आहे? उत्तर: 82.5 अंश पूर्व रेखांश रेषा प्रश्न: अर्जुन पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू झाला? उत्तर: 1961 प्रश्न: मॅगसेसे पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण होते? उत्तर : विनोबा भावे प्रश्नः अल्ट्रासोनिक लहरींची वारंवारता किती आहे? उत्तर: 20000 Hz पेक्षा जास्त प्रश्न: भारताचा शोध कोणी लावला? उत्तर: वास्को द गामा प्रश्न: ड्युरंड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर: फुटबॉल प्रश्न: ‘अभिज्ञान शाकुंतलम’चे लेखक कोण होते? उत्तर : कालिदास प्रश्न: भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? उत्तर : डॉ भीमराव आंबेडकर प्रश्न: 1907 मध्ये सुरू झालेला साहित्याचा पहिला नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? उत्तरः रुडयार्ड किपलिंग प्रश्न: सालारजंग संग्रहालय कोणत्या शहरात आहे? उत्तर : हैदराबाद प्रश्न: पृथ्वीच्या मध्यभागी असलेला देश कोणता आहे हे तुम्हाला माहिती आहे का? उत्तर: घाना, हा तो देश आहे, जो पृथ्वीच्या मध्यभागी येतो. प्रश्न: मलेरियाचे औषध ‘क्विनाइन’ कोणत्या वनस्पतीपासून मिळते? उत्तर: सिन्कोना प्रश्न: जगातील सर्वात मोठा जिवंत पक्षी कोणता आहे? उत्तर: शहामृग प्रश्न: सम्राट अशोकाने कोणत्या युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला? उत्तर: कलिंग युद्ध प्रश्न: जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? उत्तर: नाईल नदी प्रश्न: गंगेचा कोणता भाग राष्ट्रीय जलमार्ग म्हणून घोषित करण्यात आला आहे? उत्तरः अलाहाबाद ते हल्दिया. प्रश्न: काबर आणि मार ही उत्तर प्रदेशातील कोणत्या प्रकारच्या मातीची स्थानिक नावे आहेत? उत्तर : मिर्झापूर आणि सोनभद्र.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.