नवी दिल्ली 30 एप्रिल : सिंह हा जगातील सर्वात धोकादायक वन्य प्राण्यांपैकी एक आहे, त्यामुळे त्याच्यापासून दूर राहणंच चांगलं आहे. माणसं असोत की इतर कुठलेही वन्य प्राणी, जीव वाचवायचा असेल तर प्रत्येकाला सिंहापासून दूर राहावं लागेल. विशेषत: हरणासारखे प्राणी, कारण हरिण ही सिंहांची शिकारीसाठीची पहिली पसंती असते. सिंहांना कुठेही हरण दिसले तर ते त्यांच्या मागे धावतात आणि त्यांची शिकार करूनच शांत होतात. ऐकावं ते नवलच! वर्षातून केवळ दोन दिवसांसाठी झाडाच्या खोडातून कोसळतो धबधबा, VIDEO सोशल मीडियावर तुम्हाला सिंहाच्या शिकारीशी संबंधित सर्व प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील. असाच एक व्हिडिओ (Lioness Attack on Deer) सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक सिंहीण एका छोट्या हरणाची शिकार करताना दिसत आहे. या व्हिडिओतील (Video Viral) खास बाब म्हणजे सहसा सिंह आणि सिंहिणीला पाहून हरिण पळून जातं मात्र यामधील लहान हरिण सिंहीणीशीच लढण्याच्या मूडमध्ये दिसतं.
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक सिंहीण आणि बरेच छोटे सिंह आजूबाजूला फिरत आहेत आणि त्यांच्या जवळच एक हरणही आहे. हरणाकडे दुर्लक्ष करून सिंहीण तिच्या वाटेने जात असते, मात्र हरिण विनाकारण तिच्याशी भिडतं. पहिल्यांदा सिंहीण त्याच्याकडे दुर्लक्ष करते, पण जेव्हा लहान हरिण तिच्यावर पुन्हा हल्ला करतं, तेव्हा तिचं मन भरकटतं आणि ती हरणावर तुटून पडते. ती हरणाची मान पकडते आणि एका झटक्यात त्याचे काम संपवते. बिचाऱ्या हरणाला नाहक जीव गमवावा लागला. त्याने सिंहिणीला त्रास दिला नसता, तर कदाचित त्याचा जीव वाचला असता. बापरे! तरुणाच्या खांद्यावर चढले 2 महाकाय अजगर आणि…; थरकाप उडवणारा VIDEO हा धक्कादायक व्हिडिओ wildlife_stories_ नावाच्या अकाऊंटवरुन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 1.5 दशलक्ष म्हणजेच 15 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तर 18 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केलं आहे. सोबतच लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत. कुणीतरी लिहिलंय की सिंहांना दया येत नाही. तर अनेकांनी छोट्या हरणाच्या धाडसाचं कौतुक केलंय.