नवी दिल्ली, 29 एप्रिल: ‘देवाची करणी अन् नारळात पाणी,’ अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आपल्या आजूबाजूला काही वस्तू किंवा काही घटना इतक्या विचित्र असतात की त्यांच्याबद्दल समजल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. माँटेनिग्रो (Montenegro) या देशात आश्चर्य वाटेल असं एक झाड आहे. माँटेनिग्रोची राजधानी असलेल्या पॉडगोर्सियापासून (Podgorica) पाच किलोमीटर अंतरावर डिनोसा नावाच्या ठिकाणी एक तुतीचं झाड आहे. या झाडाची उंची 1.5 मीटर आहे. युरो न्यूजच्या वृत्तानुसार, स्थानिक लोक या झाडाला जगातील आश्चर्यकारक झाड (Amazing Tree) मानतात. कारण, या झाडाच्या खोडातून एखाद्या धबधब्याप्रमाणे (Waterfall) पाणी बाहेर पडतं. प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, दरवर्षी हिवाळ्याच्या (Winter) शेवटी या झाडातून धबधब्यासारखं पाणी पडू लागतं. धबधब्याचा या परिसरात विविध प्रकारची झाडं आहेत. मात्र, खोडातून पाणी बाहेर पडण्याची घटना फक्त या 150 वर्षं जुन्या तुतीच्या झाडाबद्दलच (Mulberry) बघायला मिळते. बीबीसीच्या वृत्तानुसार दरवर्षी हिवाळ्यात या झाडामधून पाणी बाहेर पडतं. या झाडाच्या रिकाम्या खोडातून पाणी वरपर्यंत पोहोचतं. हे दृश्य दुर्मिळ तर आहेच; पण सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा प्रकार वर्षातील एक किंवा दोन दिवसांसाठीच घडतो. जेव्हा असं होतं तेव्हा हे झाड आकर्षणाचं केंद्र ठरतं. वर्षातील इतर दिवशी या झाडातून पाणी येत नाही.
Nature never ceases to amaze us!
— Parimal Nathwani (@mpparimal) June 21, 2021
This Mulberry #tree in #Montenegro leaks water during spring floods every year due to high groundwater pressure & the hollow section inside the tree. #Nature #NaturePhotography #ViralVideo #whatsappwonderbox pic.twitter.com/aOe5ac6ouy
युरो न्यूजनुसार, तज्ज्ञांचं मत आहे की या झाडाच्या मुळांखाली पाण्याचा मोठा स्त्रोत (Water Source) आहे. हा स्रोत थेट त्याच्या मुळांशी जोडलेला आहे. हिवाळ्यात बर्फ वितळल्यानं किंवा अतिवृष्टीमुळे जमिनीतील पाण्याची पातळी (Water Level) वाढते. पाण्याचा दाब वाढल्यामुळे झाडाच्या पोकळ खोडामध्ये पाणी साचतं आणि मग ते जागा मिळेल तिथून बाहेर पडते. वर्षानुवर्षे हे पाणी बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत होतं. शेवटी त्याला थेट झाडाच्या खोडामधून बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडला. झाडाच्या खोडातून बाहेर पडणारं पाणी पाहण्यासाठी स्थानिक नागरिक व पर्यटक लांबून येत आहेत. भारतातही घडल्या आहेत अशा घटना माँटेनिग्रोप्रमाणेच भारतातील मध्य प्रदेशातील छिंदवाडा (Chhindwara) येथेही झाडातून पाणी बाहेर पडल्याची घटना पाहायला मिळाली होती. स्थानिक नागरिकांना येथील झाडाच्या खोडातून पाणी बाहेर पडताना स्थानिकांना दिसलं होतं. ही अनोखी घटना पाहण्यासाठी अनेक स्थानिक लोक जमा झाले होते. अशीच एक घटना छत्तीसगडमधील गरिआबंद जिल्ह्यातही पाहायला मिळाली होती. पण माँटेनिग्रोच्या तुलनेत या दोन्ही घटना पूर्णपणे वेगळ्या होत्या. या दोन्ही ठिकाणी पाणी धबधब्यासारखं वाहत नव्हतं. निसर्गामध्ये अनेक किमया घडत असतात. माँटेनिग्रोतील तुतीच्या झाडाबाबत घडणाऱ्या घटनेलाही, अशीच किमया मानलं जातं आहे.