Home /News /viral /

बापरे! तरुणाच्या खांद्यावर चढले 2 महाकाय अजगर आणि...; थरकाप उडवणारा VIDEO

बापरे! तरुणाच्या खांद्यावर चढले 2 महाकाय अजगर आणि...; थरकाप उडवणारा VIDEO

एकाच वेळी दोन अजगरांना त्याने खांद्यावर घेतलं आणि पुढे जे घडलं ते धक्कादायक आहे.

  नवी दिल्ली, 29 एप्रिल : सापाचं नाव ऐकलं तरी आपल्यापैकी अनेकांच्या अंगावर काटा येतो. पण काही लोक असे आहेत ज्यांना सापाची अजिबात भीती वाटत नाही. साधा साप नव्हे तर अगदी अजगरांसोबतही ते काहीतरी स्टंट करताना दिसतात. जे पाहूनच आपल्याला धडकी भरते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एका व्यक्तीने चक्क दोन दोन अजगरांना आपल्या खांद्यावर घेतलं आहे आणि त्यानंतर त्याने जे केलं ते आणखी थक्क करणारं आहे (Python on shoulder). दोन दोन अजगरांना आपल्या खांद्यावर घेणाऱ्या या तरुणांना सर्वांना धक्का दिला आहे. आपण स्वप्नातही विचार करू शकत नाही ते या तरुणाने प्रत्यक्षात केलं आहे. व्हिडीओत पाहू शकता एका ठिकाणी या व्यक्तीने दोन्ही अजगरांना आपल्या खांद्यावर घेतलं आहे (Man dance with Python). आता अजगराचं वजन किती असावं हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. अशा अजगरांना खांद्यावर घेतल्याने त्याची काय अवस्था झाली असेल याची कल्पना तुम्ही करूच शकता. या तरुणाचे खांदेही खाली वाकल्याचं दिसतं आहे. त्याच्या अंगावर अजगरांना पाहून आपल्या हृदयाची धडधड वाढली आहे. पण त्या तरुणाच्या चेहऱ्यावर मात्र बिलकुल भीती नाही. उलट तो या अजगरांसोबत डान्स करू लागतो. हे वाचा - कॅमेऱ्यात कैद झालं श्वानाचं खतरनाक कृत्य; VIDEO पाहून नेटिझन्स म्हणाले, 'याला अटक करा' जेव्हा अजगर पूर्णपणे त्याच्या खांद्यावर असतात तेव्हा हा तरुण काहीतरी स्टेप करून दाखवतो. समोरून कोणीतरी त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. हा व्हिडिओ हैराण करणारा असून नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.
  worldsofsnake इंस्टाग्रामव अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर अनेक लोक व्हिडिओ शेअरही करत आहेत. हे वाचा - चिमुकल्यांचं एक छोटंसं पाऊल, वाचला कित्येक लोकांचा जीव; Must Watch Video तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Dance video, Python, Python snake, Viral, Viral videos, Wild animal

  पुढील बातम्या