मुंबई 25 मार्च : सिंह हा जगातील सर्वात धोकादायक प्राणी मानला जात असला तरी, सिंहाशिवाय पृथ्वीवर असे अनेक प्राणी आहेत, जे धोकादायक आणि घातक मानले जातात. यामध्ये वाघ, बिबट्या, चित्ता आणि हायना इत्यादींचा समावेश आहे. विशेषत: हायनांबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की त्यांचं पोट एखाद्या विहिरीप्रमाणे असतं. म्हणजेच त्यांनी कितीही खाल्लं तरी पोट भरत नाही. तुम्ही पाहिलं असेल की हायना अनेकदा कळपात राहतात आणि संधी मिळताच सिंहांवर हल्ला करतात. जोरात धावत होता हरणांचा कळप; इतक्यात चित्त्याने मोठी उडी घेत झडप मारली अन्…, शिकारीचा VIDEO असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हायनाचा कळप एका सिंहिणीवर हल्ला करतो. पण त्यानंतर असं काही होतं की या हायनांलाच तिथून पळून जावं लागतं. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की हायना कसे सिंहिणीचा पाठलाग करत आहेत आणि तिला आपली शिकार बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान, सिंहीण त्यांच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करते, परंतु तिथे इतके हायना असतात की सिंहिणीला काहीच करता येत नाही आणि हे प्राणी तिला ओरबाडू लागतात. तेव्हाच आणखी काही सिंहीण तिथे पोहोचतात आणि हायनाची अवस्था बिकट होते.
सिंहीणांना अशा प्रकारे हल्ला करण्याच्या तयारीत येताना पाहून हायना तिथून पळू लागतात. सुदैवाने शेवटच्या क्षणी इतर सिंहीणी आपल्या साथीदाराच्या मदतीसाठी तिथे पोहोचतात. अन्यथा हायनाच्या कळपाने तिला ओरबाडून खाल्लं असतं. हिंस्र प्राण्यांचं असं गँगवॉर तुम्ही क्वचितच पाहिलं असेल. अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 13 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 19 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी लाईकही केला आहे.
त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी विविध कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, ‘कधीही एकटं फिरू नये, अन्यथा अशी परिस्थिती येऊ शकते. मी माझ्या मुलालाही हा सल्ला दिला आहे’, आणखी एका युजरने लिहिलंआहे की, ‘हे वर्ल्ड वॉर 3 वाटत आहे’.