मराठी बातम्या /बातम्या /Viral /जोरात धावत होता हरणांचा कळप; इतक्यात चित्त्याने मोठी उडी घेत झडप मारली अन्..., शिकारीचा VIDEO

जोरात धावत होता हरणांचा कळप; इतक्यात चित्त्याने मोठी उडी घेत झडप मारली अन्..., शिकारीचा VIDEO

जेव्हा अनेक पर्यटक वन्यजीवांचा आनंद घेण्यासाठी जंगलात पोहोचले होते. त्याचवेळी जीव वाचवण्यासाठी हरणांचा कळप वेगाने धावत रस्त्यावर आला. जे पाहून पर्यटकांची मने प्रसन्न झाली. पण ..

जेव्हा अनेक पर्यटक वन्यजीवांचा आनंद घेण्यासाठी जंगलात पोहोचले होते. त्याचवेळी जीव वाचवण्यासाठी हरणांचा कळप वेगाने धावत रस्त्यावर आला. जे पाहून पर्यटकांची मने प्रसन्न झाली. पण ..

जेव्हा अनेक पर्यटक वन्यजीवांचा आनंद घेण्यासाठी जंगलात पोहोचले होते. त्याचवेळी जीव वाचवण्यासाठी हरणांचा कळप वेगाने धावत रस्त्यावर आला. जे पाहून पर्यटकांची मने प्रसन्न झाली. पण ..

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 24 मार्च : जंगलाचा एकच नियम आहे, बलवानांना जगायचं असेल तर दुर्बलांची शिकार करणं आवश्यक आहे. हा नियम बदलणं अशक्य आहे. कारण पृथ्वीच्या समतोलासाठी म्हणजेच इको सिस्टीमसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. त्यात कुणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर जंगलाचा कायदा आणि पृथ्वीचा समतोल बिघडतो. मात्र, ही वेगळी गोष्ट आहे की, जेव्हा मानव स्वत:च्या डोळ्यांनी शिकार होतानाचं दृश्य पाहतो, तेव्हा त्याचा थरकाप उडतो. प्राणीप्रेमींना हे अजिबात सहन होत नाही. सध्या एक असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात हरणांच्या कळपाच्या मागे धावणाऱ्या चित्त्यांने अशी शिकार केली की पर्यटकही ओरडू लागले.

पलंगावर लपून बसला होता 6 फूट लांब विषारी साप; महिलेनं चादर उचलताच..., थरकाप उडवणारी घटना

ranger.cole या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये पर्यटकांसमोर हरणांचा कळप जीव मुठीत धरून धावताना दिसला. मात्र पुढच्याच क्षणी चित्त्याने आपला वेग दाखवत हरणाचा बळी घेतला. त्यानंतर दोन चित्त्यांनी मिळून या हरणाला पकडून जंगलात नेलं. शिकारच्या या व्हिडिओला 3,700 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by @ranger.cole

चित्त्याचा वेगात धावतानाचा आणि हरणांची शिकार करतानाचा व्हायरल व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेतील पिलानेसबर्ग गेम रिझर्व्हमधील आहे. हे दुर्मिळ दृश्य त्यावेळचं आहे , जेव्हा अनेक पर्यटक वन्यजीवांचा आनंद घेण्यासाठी जंगलात पोहोचले होते. त्याचवेळी जीव वाचवण्यासाठी हरणांचा कळप वेगाने धावत रस्त्यावर आला. जे पाहून पर्यटकांची मने प्रसन्न झाली. पण पुढच्याच क्षणी काय होणार आहे याची त्यांना कल्पना नव्हती. या हरणांच्या कळपामागे भयंकर शिकारी चित्ता धावत होता. ज्यांच्या वेगापुढे हरणांचा वेग काहीच नव्हता. हरणांचा व्हिडिओ कॅमेऱ्या कैद करणाऱ्या पर्यटकांसमोरच अचानक चित्ता आला आणि हरणाची शिकार करून त्याला जंगलात घेऊन गेला.

हरण खूप वेगवान मानलं जातं पण चित्त्याच्या वेगाची जगात कोणतीच बरोबरी नाही. चित्ता 3 सेकंदात ताशी 103 किलोमीटर वेगाने धावू शकतो. त्यामुळेच चित्त्याने वेगाने धावणाऱ्या हरणांच्या कळपाला लक्ष्य केले आणि शेवटी एका हरणाला पकडण्यात त्याला यश आलं. यानंतर दोन चित्त्यांनी पकडून त्याला जंगलात नेलं. कॅमेऱ्यात कैद झालेलं हे दृश्य पर्यटकांसाठी हृदय पिळवटून टाकणारं होतं.

First published:
top videos

    Tags: Viral video on social media, Wild animal