जाहिरात
मराठी बातम्या / Viral / नदीच्या पाण्यातच मगरीचा सिंहावर हल्ला; जबरदस्त लढाईचा LIVE VIDEO, पाहा काय झाला शेवट

नदीच्या पाण्यातच मगरीचा सिंहावर हल्ला; जबरदस्त लढाईचा LIVE VIDEO, पाहा काय झाला शेवट

नदीच्या पाण्यातच मगरीचा सिंहावर हल्ला; जबरदस्त लढाईचा LIVE VIDEO, पाहा काय झाला शेवट

Crocodile and Lioness Fight: व्हिडिओमध्ये मगर आणि सिंहिणीचा सामना झाल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की सिंह आणि चित्ता पाण्यात जाऊन मगरीसोबत पंगा घेतात

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 20 फेब्रुवारी : सिंह आणि सिंहिणी यांचा जंगलात वेगळाच दरारा असतो. त्यांना सामोरे जाण्याची ताकद जंगलात कोणत्याही प्राण्यात नसते. त्यामुळे या प्राण्यापासून सगळेच दूर राहतात. मात्र जंगलात हा प्राणी कितीही ताकदवर असला तरी पाण्यात मगरीच्या ताकदीपुढे सिंहालाही हार मानावी लागते. सोशल मीडियावर आजपर्यंत तुम्ही मगरीचे अनेक व्हि़डिओ पाहिले असतील. हे व्हिडओ अपलोड होताच चांगलेच व्हायरल होतात. सध्या असाच एक मगरीचा आणि सिंहिणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे (Lioness and Crocodile Fight Video). चिखलात फोटोशूट करायला निघालेले नवरी-नवरदेव; पाय घसरताच झाली भलतीच फजिती, Video हा व्हिडिओ इतका भयानक आहे, की पाहून तुमचाही थरकाप उडेल. व्हिडिओमध्ये मगर आणि सिंहिणीचा सामना झाल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की सिंह आणि चित्ता पाण्यात जाऊन मगरीसोबत पंगा घेतात. मात्र हे दृश्य खूपच कमी पाहायला मिळतं कारण पाण्यात मगर जास्त ताकदवर असते. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओध्ये मगर सिंहिणीवर हल्ला करताना दिसते.

जाहिरात

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की सिंहिण पाणी पिण्यासाठी नदीच्या काठावर जाते. यादरम्यान तिच्या डोक्यात काहीतरी विचार येतो आणि ती नदीच्या पाण्यात उतरून आरामात पोहू लागते. यादरम्यान मागून एक मगर तिच्यावर अचानक हल्ला करते. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे सिंहिण घाबरते. यानंतर लगेचच सिंहिण मगरीच्या तावडीतून आपली सुटका करते आणि तिथून पळ काढते. भयंकर वादळादरम्यान ब्रिटनच्या विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचं लँडिंग; VIDEO व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की सिंहिण मगरीच्या हल्ल्यातून वाचते आणि पाण्यातून लगेचच बाहेर निघते. मगरीने ज्याप्रकारे सिंहिणीवर हल्ला केला आणि तिची मान पडकली, ते पाहून सिंहिणीचं मगरीच्या तावडीतून वाचणं अशक्य वाटत होतं. मात्र सिंहिणीचं नशीब चांगलं असतं की ती मगरीच्या हल्ल्यातूनही वाचते आणि संधी मिळताच पळ काढते. हा व्हिडिओ wild_animals_creation नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात