नवी दिल्ली 20 फेब्रुवारी : आजकाल सोशल मीडियावर लग्नातील व्हिडिओ (Wedding Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. यातील काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की ते पाहून हसू आवरत नाही. सध्या असाच एक मजेशीर वेडिंग व्हिडिओ (Funny Video of Bride and Groom) समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही खळखळून हसाल. नवरदेव मिठाई खाऊ घालत होता, पण भडकलेल्या नवरीनं केलं भलतंच कृत्य; अजब VIDEO व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसतं की नवरी आणि नवरदेव फोटोग्राफीसाठी पोज देत आहेत. ते जिथे फोटोग्राफी करत आहेत, तिथे भरपूर चिखल आहे. यादरम्यान फोटोसाठी पोज देण्याकरता नवरदेव आपल्या नवरीला उचलून घेण्याचा प्रयत्न करतो. नवरदेवाचा प्रयत्न यशस्वी ठरतो आणि तो नवरीला उचलून घेतो मात्र यानंतर जे काही घडतं, त्याचा दोघांनी विचारही केला नसेल.
नवरीला उचलून घेतल्यानंतर नवरदेव काही अंतर चालतो आणि लगेचच त्याचा पाय घसरतो. यानंतर बॅलन्स बिघडताच नवरदेव आणि नवरी दोघंही धाडकन चिखलात कोसळतात. मात्र ते चिखलात पडले तरीही फोटोग्राफरने फोटोग्राफी करणं थांबवलं नाही. तो हा क्षणही आपल्या कॅमेऱ्यात कैद करतो. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाहीये. VIDEO: कुरकुरीत डोसा नाही तर डोशामध्ये ‘कुरकुरे’, Weird Food मुळे संतापले खवय्ये हा व्हिडिओ सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रावर शेअर केला गेला आहे. तर व्हिडिओच्या शेवटी नवरदेव आणि नवरी चिखलात पडल्यानंतर क्लिक करण्यात आलेले फोटोही दाखवले गेले आहेत. हे फोटो अतिशय सुंदर आहेत. लोक या व्हिडिओवर मजेशीर कमेंट करत आहेत. तर आतापर्यंत 24 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.