जाहिरात
मराठी बातम्या / Viral / भयंकर वादळादरम्यान ब्रिटनच्या विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचं लँडिंग; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

भयंकर वादळादरम्यान ब्रिटनच्या विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचं लँडिंग; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

भयंकर वादळादरम्यान ब्रिटनच्या विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचं लँडिंग; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

या धोकादायक युनिस वादळात एअर इंडियाच्या विमानाने एवढं लक्षवेधी लँडिंग केलं आहे की, प्रत्येकजण त्या विमानाच्या पायलटचं कौतुक करताना दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 20 फेब्रुवारी : ब्रिटन सध्या गेल्या तीस वर्षांतील सर्वात ताकदवर वादळाचा सामना करत आहे. Eunice वादळाला ब्रिटनमध्ये जेव्हापासून सुरुवात झाली आहे, तेव्हापासून सगळीकडे परिस्थिती अनियंत्रित झाली आहे. अशावेळी लंडनमधील हिथ्रो विमानतळावर विमानांचं लँडिंग करणंही कठीण झालं आहे. जोरदार वाऱ्यामुळे जड विमानंही डगमगत आहेत. मात्र या चॅलेंज दरम्यान एका भारतीय पायलटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video of Flight Landing During Storm) होत आहे. या धोकादायक युनिस वादळात एअर इंडियाच्या विमानाने एवढं लक्षवेधी लँडिंग केलं आहे की, प्रत्येकजण त्या विमानाच्या पायलटचं कौतुक करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्येही बिग जेट टीव्हीचे संस्थापक जेरी डायर्स यांचा आवाज ऐकू येतो. ते म्हणतात, की ‘हे विमान योग्यरित्या उतरू शकेल की नाही हे मला पाहायचं आहे. बहुतेक लँडिंगमध्ये यश आलेलं दिसत आहे. हा तर अतिशय कुशल भारतीय वैमानिक आहे.’ नवरदेव मिठाई खाऊ घालत होता, पण भडकलेल्या नवरीनं केलं भलतंच कृत्य; अजब VIDEO एअर इंडियाच्या या विमानाने जोरदार वाऱ्याला झुगारून यशस्वी लँडिंग केल्यानं प्रत्येक भारतीयाला याचा अभिमान वाटत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असून पायलटचं भरपूर कौतुक केलं जात आहे. व्हिडिओ शेअर करत एका यूजरने लिहिलं की, ‘हा तर खूप कुशल पायलट आहे. एअर इंडियाच्या पायलटने B787 ड्रीमलायनर विमान हिथ्रो विमानतळावर यशस्वीरित्या उतरवले आहे. इतर अनेक विमाने उतरू शकली नाहीत आणि अनेक उड्डाणेही रद्द करावी लागली. अशात भारतीय वैमानिकाने हे करून दाखवलं. जय हिंद’

जाहिरात

या वादळादरम्यान भारताच्या एक नव्हे तर दोन विमानांनी हिथ्रो विमानतळावर यशस्वी लँडिंग केलं. एक AI147 हे विमान हैदराबादहून आलं होतं, तर दुसरं AI145 गोव्याहून आलं होतं. दोन्ही विमानांनी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी लँडिंग केलं. AI147 विमानाचं नेतृत्व कॅप्टन अंचित भारद्वाज यांनी केलं होतं, तर AI145 विमानाचं नेतृत्व कॅप्टन आदित्य राव यांनी केलं होतं, असं समोर आलं आहे.

रिअल बाहुबली! हाताने धक्का देत फिरवलं रेल्वेचं इंजिन; VIDEO पाहून व्हाल अवाक

दोन्ही वैमानिकांच्या या यशस्वी लँडिंगमुळे एअर इंडियाही खूप उत्साहित आहे. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार एका अधिकाऱ्याने सांगितलं की, ब्रिटिश एअरवेज आणि कतार एअरवेजच्या विमानांना लँडिंगमध्ये खूप अडचणी येत होत्या, परंतु आपल्या वैमानिकांनी अतिशय अचूक आणि उत्कृष्ट लँडिंग करून दाखवलं. ते सर्व चांगले प्रशिक्षित आहेत

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात