जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 3 सिंहिणींनी मगरीला घेरुन अचानक केला हल्ला, पण..; शेवटी कोण जिंकलं? पाहा VIDEO

3 सिंहिणींनी मगरीला घेरुन अचानक केला हल्ला, पण..; शेवटी कोण जिंकलं? पाहा VIDEO

3 सिंहिणींनी मगरीला घेरुन अचानक केला हल्ला, पण..; शेवटी कोण जिंकलं? पाहा VIDEO

अनेक सिंहीणी एकत्र मगरीवर हल्ला करतात. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मगर पाण्यातून बाहेर आली आहे आणि एकाच वेळी अनेक सिंहीण तिच्यावर हल्ला करतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 01 जानेवारी : मगरी हा या पृथ्वीवर आढळणाऱ्या धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. मगरीसोबत पंगा घेणं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालण्यासारखं आहे. दुसरीकडे सिंहदेखील अशाच धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. हे दोन्ही असे प्राणी आहेत, ज्यांना विविध प्रकारचे वन्य प्राणीदेखील घाबरतात, अशात त्यांच्यासमोर माणसाची काय अवस्था होत असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. हे दोन्ही प्राणी माणसांचे तुकडे तुकडे करू शकतात आणि क्षणार्धात खाऊ शकतात. महाकाय गेंडा पर्यटकांच्या मागे धावत सुटला, श्वास रोखून धरायला लावणारा Video याच कारणामुळे या वन्य प्राण्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो, पण तुम्ही कधी या दोन प्राण्यांनाच एकमेकांशी भांडताना पाहिलं आहे का? असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल. भयंकर प्राण्यांची ही लढाई थोडी वेगळी आहे, कारण यात अनेक सिंहीणी एकत्र मगरीवर हल्ला करतात. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मगर पाण्यातून बाहेर आली आहे आणि एकाच वेळी अनेक सिंहीण तिच्यावर हल्ला करतात.

जाहिरात

कोणी मगरीला पकडण्याचा प्रयत्न करतं तर कोणी चावण्याचा प्रयत्न करतं, अशा परिस्थितीत मगरीकडे जीव वाचवण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे सिंहीणांच्या तावडीतून सुटका करून घेत मगर लगेचच पाण्यात गेली. आता सिंहीण पाण्याच्या आत मगरीला हारवू शकत नाही, कारण मगरीला पाण्यातील राक्षस असंही संबोधलं जातं. ती पाण्याच्या आत इतकी ताकदवर बनते की सिंहीणही तिला इजा करू शकत नाही. Viral Video : किंग कोब्रावर झाडल्या बंदुकीच्या गोळ्या, पण नेम चुकला आणि मग… मगरी आणि सिंहीणमधली ही लढाई खरोखरच अंगावर काटा आणणारी आहे. या लढाईचा व्हिडिओ beautiful_new_pix नावाच्या अकाऊंटवरुन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 77 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी व्हिडिओला लाईकही केले आहे. लोक यावर निरनिराळ्या प्रतिक्रियाही देत आहे. अनेकांनी मगर भाग्यवान असल्याचं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात