नवी दिल्ली, 31 डिसेंबर : अनेकजण पर्यटनासाठी विविध ठिकाणी जातात. वेगवेगळ्या ठिकाणचा आनंद लुटताना दिसतात. पर्यटनासाठी गेलेल्या लोकांचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असतात. काही व्हिडीओ तर इंटरनेटवर धुमाकूळ घालताना पहायला मिळतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पर्यटकांच्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या गेंड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे. आसाममधील मानस राष्ट्रीय उद्यानातील बन हबरी जंगलात ही घटना घडली आहे. एका पर्यटकाने या घटनेचा व्हिडीओ काढला असून सोशल मीडियावर शेअर केला आहे. काही क्षणातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही येत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय की, काही पर्यटक जंगल सफारीचा आनंद घेत आहेत. अचानक एका झुडपातून एक गेंडा बाहेर येतो आणि पर्यटकांच्या वाहनाचा पाठलाग करायला लागतो. या धक्कादायक प्रकारानंतर सफारी जीपमधील पर्यटक घाबरले आणि त्यांनी आरडाओरडा सुरु केला. व्हिडीओ संपेपर्यंत हा महाकाय गेंडा जंगल सफारी करणाऱ्यांच्या गाडी मागे धावताना दिसतोय. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, मानस नॅशनल पार्कच्या वेबसाइटनुसार, उद्यानाच्या या भागात वाघ, एक शिंगे असलेले गेंडे, हत्ती आणि म्हैस दिसण्याची शक्यता जास्त आहे. मानस नॅशनल पार्क हे प्रमुख पर्यटन आकर्षण म्हणून आकर्षण मिळवत आहे आणि यावर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या उद्यानाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे.
सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडिओ मनोरंजक, तर काही माहितीपर असतात. याशिवाय काही व्हिडिओ आश्चर्यकारक गोष्टींवर आधारित असतात. सोशल मीडियावर पाळीव प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात.