मुंबई 30 डिसेंबर : कितीही अत्याधुनिक शस्त्रं हाताशी असली, तरी एखादी बिकट परिस्थिती तुमच्यावर आल्यावर त्याचा कदाचित काही उपयोग होत नाही, असं घडू शकतं. हे स्पष्ट करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ केवळ 10 सेकंदांचा आहे. या व्हिडिओमध्ये असं दिसतं, की एका फणा काढून बसलेल्या नागावर एका कारमध्ये बसलेली व्यक्ती बंदुकीने 3-4 गोळ्या झाडते; पण गोळ्या मारणाऱ्याचा नेम चुकतो व नाग वाचतो. त्यानंतर मात्र नाग असं काही करतो, त्यामुळे त्या बंदूकधाऱ्या व्यक्तीला पळता भुई थोडी होते. हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. हे ही पाहा : ना Hight पाहिली ना weight गेंड्यावर चढली थेट, पुढे सिंहिणंचं काय झालं तुम्हीच पाहा Video सोशल मीडियावर Instant karma चा हा व्हिडिओ फार चर्चेचा विषय बनला आहे. केवळ 10 सेकंदांचा हा व्हिडिओ असला तरी तो पुन्हा पुन्हा पाहिला जात आहे. किंग कोब्राने गोळ्या झाडणाऱ्यांना चांगली अद्दल घडवली. हा व्हिडिओ कोणी चित्रित केला आहे व कुठे चित्रित केला आहे याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. या व्हिडिओमध्ये एक साप फणा काढून एका कच्च्या रस्त्यावर बसलेला दिसत आहे. त्याच्या समोर एक कार उभी असून तीत काही माणसं आहेत. ड्रायव्हिंग सीटवर असलेल्या व्यक्तीच्या हातात बंदूक असून, त्या व्यक्तीने किंग कोब्राच्या दिशेने बंदुकीच्या 3-4 गोळ्या झाडल्या; पण त्याचा नेम चुकतो. त्या सापाला एकही गोळी लागत नाही. विशेष म्हणजे जेव्हा ती व्यक्ती गोळ्या झाडत असते, तेव्हा सापाचं लक्ष त्या व्यक्तीकडेच असतं.
Don't bring a gun to a cobra fight! 🐍 pic.twitter.com/qGshAWdjHu
— Klip Entertainment (@klip_ent) December 16, 2022
गोळ्या लागल्या नाहीत. त्यामुळे नागाचा जीव वाचतो. त्यानंतर साप मात्र चिडतो व त्या व्यक्तीच्या दिशेने वेगात यायला लागतो. तेव्हा मात्र त्या कारमधली माणसं प्रचंड घाबरतात, ओरडू लागतात. कारच्या मिररमध्ये बंदुकीचं प्रतिबिंब दिसतं. फायरिंगचा आवाजही ऐकू येतो. तिथेच व्हिडीओ संपतो. 16 डिसेंबरला ‘इन्स्टंट रिग्रेट्स’ या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ पोस्ट केला गेला आहे. या व्हिडिओला “कोब्रासोबतच्या लढाईत बंदुकीचा काही उपयोग नाही!” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. या क्लिपला आतापर्यंत 1 लाख 95 हजारांहून अधिक व्ह्यूज, 5 हजारांहून अधिक लाइक्स आणि शेकडो प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. एका युझरने लिहिलं आहे, की, “पाय नसतानाही तो धावताना कसा दिस आहे?” दुसऱ्याने लिहिलं - “या व्यक्तीचा नेम फारच वाईट आहे.’ काही जणांनी लिहिलं आहे, की “एखाद्याच्या कर्माची फळं त्याला लगेच मिळतात.’