Home /News /viral /

अपनी गल्ली में कुत्ताही शेर! शिकार करायला आला सिंह; कुत्र्याला घाबरून ठोकली धूम; पाहा VIDEO

अपनी गल्ली में कुत्ताही शेर! शिकार करायला आला सिंह; कुत्र्याला घाबरून ठोकली धूम; पाहा VIDEO

कुत्र्याचा भयंकर अवतार पाहून सिंहही भित्री मांजर बनला.

    मुंबई, 30 ऑक्टोबर : सिंह (Lion) म्हणजे जंगलाचा राजा. ज्याला भलेभले प्राणीही घाबरतात (Animal video). पण म्हणतात ना अपनी गल्ली में कुत्ता भी शेर होता है, मग भले समोर खरा सिंहही का असेना (Lion attack video).  याचा प्रत्यत देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.  कुत्र्याला चक्क (Dog video) सिंहालाही (Lion and dog video) सोडलं नाही. कुत्र्याला घाबरून चक्क जंगलाचा राजा म्हणजे सिंहानेही धूम ठोकली आहे (Lion fear dog video). सिंह आणि कुत्र्याचा मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. एक सिंह कुत्र्याची शिकार करायला आला होता. आता कुत्रा आणि सिंह आमनेसामने आले म्हणजे कोण जिंकेल असं विचारलं तर साहजिक आपण सिंह म्हणू. पण या व्हिडीओतील कुत्र्याने मात्र आपल्याला चुकीचं ठरवलं. सिंह नाही तर चक्क कुत्र्याने बाजी मारली आहे. तुम्हाला अजूनही विश्वास बसत नाही का? मग व्हिडीओ पाहा. व्हिडीओ पाहून तर तुम्ही हैराणच व्हाल. व्हिडीओत पाहू शकता एक कुत्रा उभा आहे. तिथं झाडांमधून एक सिंह बाहेर पडतो. हळूहळू पावलं टाकत तो येतो. तुम्हाला माहिती असेल कुत्र्यांचीसुद्धा एक हद्द ठरलेली असते. म्हणजे आपल्या परिसरात ते इतर कुत्र्यांना येऊ देत नाही आणि कुणी आलं तर मग त्याला ते सोडत नाही. या कुत्र्याने तर सिंहालाही सोडलं नाही. हे वाचा - पळायचं सोडून फोटो काढत राहिला, संतप्त गेंडा धावत आला आणि...; धडकी भरवणारा VIDEO सिंहाने त्याच्या एरियात पाय ठेवताच कुत्रा घाबरणं दूर तो उलट सिंहावरच धावून गेला. सिंहाने त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला. पण कुत्रा कसला घाबरतो आहे त्याला. सिंहाचा चेहरा पाहिला तर बिचाऱ्या एका भित्र्या मांजरासारखा झाला होता. त्याला समजेना की नेमकं काय झालं आहे, कुत्रा घाबरत का नाही आहे, कुत्र्याकडे तो पाहतच राहतो. खरंतर सिंहाचा चेहरा पाहून त्याचीच दया येते. कुत्रा सिंहावर भुंकतच राहतो. सिंहाच्या डरकाळीनेही त्याला काही फरक पडत नाही. आपली डाळ काही इथं शिजणार नाही हे सिंहालाही कळून चुकतं. शेवटी तो हार पत्करतो आणि आपला जीव वाचवण्यासाठी म्हणून गुपचूप तिथून काढता पाय घेतो. कुत्र्याचं भयानक रूप पाहून तोही घाबरतो आणि तिथून धूम ठोकून पळतो. हे वाचा - अरे हे काय? एवढ्याशा कुत्र्याला घाबरून भल्यामोठ्या बिबट्याने ठोकली धूम; VIDEO VIRAL आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हे काय चाललं आहे, असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं आहे. यावर बऱ्याच युझर्सनी अपनी गल्ली में कुत्ता शेर होता है अशीच कमेंट दिली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Dog, Pet animal, Viral, Viral videos, Wild animal

    पुढील बातम्या