जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पळायचं सोडून फोटो काढत राहिला तरुण, चवताळलेला गेंडा धावत आला आणि...; धडकी भरवणारा VIDEO

पळायचं सोडून फोटो काढत राहिला तरुण, चवताळलेला गेंडा धावत आला आणि...; धडकी भरवणारा VIDEO

पळायचं सोडून फोटो काढत राहिला तरुण, चवताळलेला गेंडा धावत आला आणि...; धडकी भरवणारा VIDEO

चवताळलेला गेंडा गाडीमागे धावत सुटला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 ऑक्टोबर : वाघ, सिंह, चित्ता, बिबट्या, गेंडा (Rhino video) या जंगली प्राण्यांना (Animal video) पाहण्यासाठी आपण जंगल सफारी, नॅशनल पार्क, प्राणीसंग्रहालयात जातो. क्वचितच पाहायला मिळणाऱ्या या प्राण्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यापासून साहजिकच रोखू शकत नाही. पण त्यावेळी आपला जीवही महत्त्वाचा आहे. या प्राण्यांना आपल्या कॅमेऱ्यात टिपणं जीवावरही बेतू शकतं. असाच एक खतरनाक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल  होतो आहे. एक विशाल गेंडा गाडीच्या मागे वेगाने धावत आला (Rhino chasing jeep video). काही पर्यटक या गेंड्याला पाहून त्याचे फोटो काढत होते. गेंडा धावत येत असताना पळायचं सोडून त्यांनी गाडी तिथंच थांबली (Rhino attack video). पुढे जे घडलं ते खूपच भयावह होतं. व्हिडीओ पाहूनच तुम्हाला धडकी भरेल, घाम फुटेल, अंगावर काटा येईल.

व्हिडीओत पाहू शकता जंगलात एक जीप उभी आहे. एक भलामोठा गेंडा रस्त्यावर येतो. त्यावेळी जीपमधील तरुण या गेंड्याचा फोटो काढतो. सुरुवातीला अगदी शांत दिसतो. पण अचानकपणे तो चवताळतो आणि जीपसमोर धावत येतो. गेंड्याला आपल्या दिशेने धावत येताना पाहूनही ड्रायव्हर गाडी काही स्टार्ट करत नाही. गेंडा आपल्या धावण्याचा वेग वाढवतो आणि अगदी गाडीच्या जवळ येतो. तेव्हा ड्रायव्हर गाडी रिव्हर्स घेतो. बऱ्याच अंतरापर्यंत गेंडा या गाडीचा पाठलाग करतो. हे वाचा -  OMG! चक्क मगरीच्या जबड्यातून बाहेर पडला तरुण; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO @AfricanBushKingdom फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सुदैवाने गेंडा काही अंतरानंतर आपली दिशा बदलतो आणि या पर्यटकांचा जीव वाचतो. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहे. आपल्या जीवाशी असा खेळ करू नका, जीव धोक्यात टाकू नका, असाच सल्ला बहुतेक युझर्सनी दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात