मुंबई, 15 मार्च : कुत्रा (Dog) आणि बिबट्या (Bibtya) यांच्यात लढाई झाली तर कोण बाजी मारेल असा प्रश्न विचारला तर तुम्ही म्हणाल, साहजिकच बिबट्या. कुत्रा आणि बिबट्या यांची तुलनाच होऊ शकत नाही. कुत्रा कुठे आणि बिबट्या कुठे? पण सध्या सोशल मीडियावर असा व्हिडीओ व्हायरल होतं आहे, जिथं कुत्र्याने एक नाही तर चक्क तीन बिबट्यांना सरो की पळो केलं आहे. कुत्रा आणि बिबट्यांचा हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटवर शेअर केला आहे, ज्यामध्ये एका छोट्याशा कुत्र्याला तीन बिबट्यांनी घेरलं. पण एकाच्याही तावडीत ते सापडलं नाही. उलट कुत्र्यानेच या बिबट्यांना सरो की पळो केलं.
Once you start to believe in yourself, magic starts happening. pic.twitter.com/XQYFrqckUm
— Susanta Nanda (@susantananda3) March 14, 2021
व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला एक बिबट्या कुत्र्याचा पाठलाग करतोय. कुत्रा आपला वेग इतका वाढवतो की बिबट्यालाही तो मागे टाकतो. त्यानंतर आणखी दोन बिबटेदेखील दिसतात. एकूण तीन बिबटे या छोट्याशा कुत्र्याला घेरतात. आता हा कुत्रा या बिबट्यांची शिकार होणार, तो काय त्यांच्या तावडीतून सुटत नाही असंच हा व्हिडीओ पाहिल्यानंतर वाटेल. पण कुत्रा काही या बिबट्यांना घाबरत नाही. उलट तो त्या बिबट्यांनाच घाबरवण्याचा प्रयत्न करतो. जणू काही कुत्र्याच्या अंगात एका सिंहाचंच बळ येतं. हे वाचा - ब्लॅक पँथर आणि बिबट्याचा रंगला सामना, नंदन निलेकणींनी शेअर केला भन्नाट VIDEO कुत्र्याचं हे असं रूप पाहून बिबटेही हादरतात. कुत्रा एका बिबट्यावर जोरजोरात भुंकतो. त्यावेळी बिबट्या तिथून धूम ठोकून पळतो. कुत्रा त्याचा पाठलाग करतो. तर इतर दोन बिबटेही शांतच राहतात ते काही त्या कुत्र्याचा पाठलाग करत नाहीत. कुत्रा संधी साधून आपला मार्ग बदलतो आणि बिबट्यांच्या तावडीतून अगदी हुशारीनं आपली सुटका करून घेतो. हे वाचा - हे चॅलेंज फक्त महिलांनाच जमतंय पुरुषांना का नाही? कित्येकदा एकाच बिबट्याच्या तावडीतून अशा छोट्या प्राण्यांची सुटका होणं शक्यच नसतं. पण जर हिंमत असेल आणि लढण्याची जिद्द असेल तर काहीही शक्य आहे हे या कुत्र्याने तीन तीन बिबट्यांना हरवून दाखवून दिलं आहे. हा व्हि़डीओ पाहून बिबट्याच्या हिंमतीला सर्वांनीच दाद दिली आहे.