मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पाण्यात घुसूनच मगरीवर थेट अटॅक; शिकारीचा थरारक VIDEO

पाण्यात घुसूनच मगरीवर थेट अटॅक; शिकारीचा थरारक VIDEO

पाण्यात वर्चस्व असलेल्या मगरीची शिकार होतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाण्यात वर्चस्व असलेल्या मगरीची शिकार होतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाण्यात वर्चस्व असलेल्या मगरीची शिकार होतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : अनेक प्राण्यांना जंगलात अन्नासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ही खरंतर एकप्रकारची अन्नसाखळीच असते. पण एखादा शिकारी प्राणी कधी दुसऱ्या प्राण्याची शिकार करेल याचा काही नेम नसतो. त्यामुळे जंगलात अशा प्राण्यांपासून वाचण्यासाठी इतर प्राण्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. सिंह जसा जंगलाचा राजा मानला जातो. तसंच मगरही पाण्यातील एखाद्या राजापेक्षा कमी नाही. पण तरीही पाण्यात उडी मारून बिबट्याने भल्यामोठ्या मगरीची शिकार केल्याच्या काही घटना एका व्हिडीओतून समोर आल्या आहेत. पाण्यात वर्चस्व असलेल्या मगरीची शिकार होतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Mutumwa Mawere नावाच्या युजरने, बिबट्याने मगरीची शिकार केल्याच्या अनेक घटनांचा एक व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत सुरुवातीला एका एकट्या मगरीवर काही सिंहीणीची झुंड अटॅक करताना दिसतेय. पण मगर यातून स्वत:चा कसाबसा बचाव करण्याचा प्रयत्न करतेय. त्यानंतर पुढील काही व्हिडीओत बिबट्या पाण्यात असलेल्या मगरीवरच हल्ला करताना दिसतोय.

(वाचा - नदी पार करणाऱ्या झेब्रावर मगरीचा हल्ला; पुढे असं काही झालं...पाहा नदीतल्या थराराचा VIDEO)

बिबट्या अगदी सावज हेरून, दबक्या पावलांनी येत, झपकन मगरीवर झडप घातल्याचा थरार व्हिडीओत दिसतो आहे. पाण्यात विहार करणाऱ्या मगरीला लांबूनच पाहून, एका टोकाला असलेला बिबट्या त्यांच्या लाँग आणि तितक्याच स्ट्राँग उडीने मगरीवर अशी काही झडप घालतो, की मगरीला आपली पकड घट्ट करत पाण्यातून काही सेकंदात वरही घेऊन जातो.

(वाचा - भुकेल्या बिबट्यांसाठी मांस घेऊन पोहोचले तरुण; कळपानं बिबटे आले आणि... पाहा VIDEO)

व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत बिबट्या, सिंह, चित्त्याच्या ताकदीचं वर्णनही केलं आहे. फेसबुकवर शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या असून हा व्हिडीओ जबरदस्त रिशेअरही करण्यात आला आहे.

First published:

Tags: Facebook, Video viral