• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • सिंहाला हात लावण्यासाठी टूरिस्टने उघडली बसची खिडकी अन्..., VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं

सिंहाला हात लावण्यासाठी टूरिस्टने उघडली बसची खिडकी अन्..., VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं

टूरिस्ट बसची खिडकी ओपन करुन सिंहाला हात लावण्याचा प्रयत्न करतो. याचवेळी सिंह आणि टूरिस्टमधील भयंकर प्रकार व्हिडीओत कैद झाला आहे.

 • Share this:
  साउथ अफ्रिका, 3 नोव्हेंबर : सोशल मीडियावर सध्या काही टूरिस्टचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. व्हिडीओमध्ये टूरिस्ट एका नॅशनल पार्कमध्ये असल्याचं दिसतंय. या पार्कमध्ये एका बसजवळ एक सिंह येतो, त्यावेळी टूरिस्ट बसची खिडकी ओपन करुन सिंहाला हात लावण्याचा प्रयत्न करतो. याचवेळी सिंह आणि टूरिस्टमधील भयंकर प्रकार व्हिडीओत कैद झाला आहे. सोशल मीडियावर या व्यक्तीवर अतिशय टिका केली जात असून अनेकांनी त्याला हा मूर्खपणा असल्याचं म्हटलं आहे. हा भयंकर व्हिडीओ Maasai Sightings नावाच्या यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सेरेनगेटी नॅशनल पार्कमध्ये शूट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये एक टूरिस्ट बसची खिडकी ओपन करुन सिंहाला हात लावण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्याच्या हातात कॅमेराही आहे.

  Video: सिंहासमोर जमिनीवर झोपून फोटो काढत होता फोटोग्राफर; पाहा पुढे काय घडलं

  सिंहाला हात लावल्यानंतर तो आधी काही करत नाही. पण पुढच्या काही सेकंदात तो चिडतो आणि त्या व्यक्तीवर रागात गुरगुरू लागतो. यामुळे तो व्यक्ती घाबरतो आणि घाईत खिडकी बंद करण्याचा प्रयत्न करतो. सिंहाने त्या व्यक्तीवर खिडकीतूनच हल्ला केल्याचं समजू शकतं, ज्यामुळे त्या व्यक्तीची स्थिती खराब होते. Maasai Sightings ने कॅप्शनमध्ये लिहिलंय, की हे एक मूर्खपणाचं काम आहे, असं करुन तुम्ही तुमचा जीव धोक्यात टाकता. असं केल्याने नॅशनल पार्क तुमच्यावर प्रतिबंध लावू शकतात.

  बापरे! मृत्यूनंतर हरणानं घेतला बदला; घाबरून बिबट्यानं ठोकली धूम, पाहा VIDEO

  हा व्हिडीओ आतापर्यंत सहा लाखहून अधिक वेळा पाहण्यात आला असून अनेक जण विविध प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी त्याला त्याचं हे वागणं अतिशय बेजबाबदारपणाचं, चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.
  Published by:Karishma
  First published: