मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बापरे! मृत्यूनंतर हरणानं घेतला बदला; घाबरून बिबट्यानं ठोकली धूम, पाहा VIDEO

बापरे! मृत्यूनंतर हरणानं घेतला बदला; घाबरून बिबट्यानं ठोकली धूम, पाहा VIDEO

बिबट्याचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Leopard) होत आहे. यात बिबट्या एका हरणाची शिकार करून हे हरण झाडावर नेऊन ठेवतो

बिबट्याचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Leopard) होत आहे. यात बिबट्या एका हरणाची शिकार करून हे हरण झाडावर नेऊन ठेवतो

बिबट्याचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Leopard) होत आहे. यात बिबट्या एका हरणाची शिकार करून हे हरण झाडावर नेऊन ठेवतो

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 02 नोव्हेंबर : बिबट्या (Leopard) हा भीतीदायक आणि हिंस्र प्राण्यांमधील एक आहे. डोळ्याची पापणी मिटण्याच्या आत तो आपली शिकार करतो. अतिशय सहजपणे आणि वेगात तो शिकार करतो. सध्या बिबट्याचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Leopard) होत आहे. यात बिबट्या एका हरणाची शिकार करून हे हरण झाडावर नेऊन ठेवतो. मात्र, पुढे असं काही घडतं, जे पाहून तुम्हीही म्हणाल की हरणाने आपला बदला घेतला. रस्त्यावरील खड्ड्याने घेतला इंजिनिअरचा बळी; बसखाली चिरडून मृत्यू, अपघाताचा VIDEO व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की बिबट्याने आपल्या जबड्यात एक मृत हरण पकडलेलं आहे. यानंतर तो हरणाला तोंडात पकडूनच झाडावर चढतो. यानंतर मृत हरणाला झाडाच्या फांदीवर ठेवून तो खाली उतरतो. यानंतर जे घडतं ते अतिशय मजेशीर आहे. तुम्ही पाहू शकता, की झाडावर बिबट्याचा बछडाही बसलेला आहे. चुकून त्याच्याकडून हरणाचा मृतदेह खाली कोसळतो आणि थेट बिबट्याच्या अंगावर पडतो. अचानक वरून काहीतरी पडल्याचं जाणवताच बिबट्या घाबरतो आणि मोठी उडी मारून बाजूला होतो. एका मिनिटाचा हा व्हिडिओ यूट्यूबवर Latest Sightings नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. एक दिवस आधी शेअर केलेला हा व्हिडिओ 35 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. काही यूजरनी हा हरणाने घेतलेला बदला असल्याचं म्हटलं. 18 वर्षाच्या तरुणाने केलं 71 वर्षाच्या महिलेसोबत लग्न; आता जगतायेत असं आयुष्य एक हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, अद्भुत फुटेज आहे. मात्र, ज्याप्रकारे हरण बिबट्यावर पडलं, ते अतिशय विनोदी वाटलं. दुसऱ्या एका यूजरनं कमेंट करत म्हटलं, व्हिडिओ पाहून असं वाटलं, की हरण मृत्यूनंतरही बिबट्यासोबत लढत आहे. इतरही अनेकांनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
First published:

Tags: Deer, Funny video, Leopard

पुढील बातम्या