नवी दिल्ली 22 जुलै : सिंह म्हणजेच जंगलाचा राजा हा जंगलातील सर्वात भयानक शिकारी आहे. हा प्राणी इतर प्राण्यांसमोर येताच ते आपला मार्ग बदलतात. सर्वात मोठ्या प्राण्यापासून ते अगदी लहान प्राण्यापर्यंत सर्वांनाच सिंहाची भीती वाटते. आता ज्या प्राण्याला इतर मोठमोठे जीवही घाबरतात, तो प्राणी माणसासमोर आला तर काय होईल? याचं उत्तर एका व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. ज्यात एक व्यक्ती सिंहाच्या हद्दीत शिरण्याचं धाडस करताना दिसतो. @earth.reel नावाच्या Instagram अकाऊंटवर अनेकदा हैराण करणारे व्हिडिओ पोस्ट केले जातात. अलीकडेच या अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक हिंस्त्र सिंह माणसावर हल्ला करताना दिसत आहे. जंगलात उघड्यावर फिरणार सिंह असो किंवा पिंजऱ्यात बंद असो, तो तितकाच भयानक असतो. अशा परिस्थितीत माणसाने त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणंही अतिशय धोकादायक ठरू शकतं. परंतु काही लोकांना वन्य प्राण्यांना त्रास द्यायला इतकं आवडतं की यासाठी ते आपला जीवही धोक्यात टाकायला तयार असतात.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती सिंहाच्या बंद असलेल्या पिंजऱ्यासारख्या मोठ्या जागेत शिरताना दिसत आहे. अचानक तो गेटमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागतो आणि तिथून पळू लागतो. तेव्हाच त्याच्या मागे सिंह येत असल्याचं दिसून येतं. ती व्यक्ती गेटमधून बाहेर जाणारच होती, इतक्यात सिंहाने त्याला पकडलं आणि मग त्याला तोंडाने धरून जमिनीवर आपटलं. सिंहाने व्यक्तीला ओढत दूरवर नेलं आणि उभा राहून त्याला पाहत राहिला. त्यानंतर या व्यक्तीचं काय झालं, हे व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेलं नाही. Viral Video : साप गळ्यात गुंडाळून स्टंट करणं भोवलं; तरुणाची अवस्था पाहून थरकाप उडेल असंही असू शकतं, की हा व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी बनवला गेला आहे आणि सिंह या व्यक्तीसोबत फक्त मस्ती करत आहे. कारण अनेकदा ट्रेनर सहज सिंहांच्या जवळ जातात आणि सिंह त्यांच्यावर हल्लाही करत नाही. व्हायरल व्हिडिओला 40 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकजणाने विचारलं, की ती व्यक्ती आत काय करत होती! एकाने सांगितलं, की सिंह हा अशा काही प्राण्यांपैकी एक आहे ज्यांना पाळीव प्राणी बनवता येत नाही. त्याला पाळीव प्राणी समजण्याची चूक कधीही करू नये. आणखी एकाने कमेंट केली, की लोक अशा गोष्टी का करतात?