नवी दिल्ली 31 मार्च : तुम्ही सर्वांनी जंगलाचा राजा सिंहाविषयी ऐकलं असेल की, जेव्हा तो शिकार करतो तेव्हा तो समोरच्या प्राण्याचा जीव घेतल्याशिवाय थांबतच नाही. आजकाल सिंहांचे अनेक प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाता आपल्याला पाहायला मिळतात. काही लोकांनी तर असे धोकादायक प्राणी पाळायलाही सुरुवात केली आहे. मात्र सिंह कधीही कोणावरही हल्ला करू शकतो. त्यांना तुम्ही पाळलं आणि कितीही जीव लावला तरी ते भडकल्यावर कोणावरही हल्ला करू शकतात.
सध्या सोशल मीडियावर हेच दाखवणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हीही हैराण व्हाल. या व्हिडिओमध्ये रागात सिंह अचानक आपल्या मालकावर हल्ला करताना दिसतो. जेव्हा एका व्यक्तीने पाळीव सिंहांशी खेळण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो सिंह भडला. सिंह आपल्याला हल्ला करतील हे या व्यक्तीला माहीत नव्हतं. हा व्हिडिओ खूपच धक्कादायक आहे. ही क्लिप @zahidkhizar786 नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
View this post on Instagram
व्हायरल क्लिपमध्ये दोन पाळीव सिंह एका व्यक्तीकडे जाताना दिसत आहेत. त्यापैकी एकाने या व्यक्तीला पकडलं पण सुदैवाने त्याला फार इजा होत नाही. सिंहाने त्याचा हात जबड्यात पकडल्याचं दिसतं. मात्र, इतक्यात दुसरा एक व्यक्ती तिथे येतो आणि या व्यक्तीला सिंहाच्या तावडीतून सोडवतो. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'माझ्यावर सिंहाचा धोकादायक हल्ला'.
हा व्हिडिओ नेटिझन्सनी लाखो वेळा पाहिला असून अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने विचारलं की, "सिंहाला पाळीव प्राणी म्हणून ठेवणं कायदेशीर कसं आहे? तो आपल्या घरात वन्य प्राणी कसा ठेवतो? हे कायद्याच्या विरोधात आहे." दुसऱ्या एका व्यक्तीने म्हटलं की, "सिंहांना पाळीव प्राणी म्हणून ठेवलं जात नाही. त्यांना मोकळ्या जागेत मुक्तपणे फिरू द्यावं." तर तिसऱ्यानेही कमेंट करत म्हटलं, की त्यांना त्या भीतींमधून मुक्त करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lion, Shocking video viral