जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मगरीच्या पाठीवर बसून जबडा उघडण्याचा केला प्रयत्न; व्यक्तीला भलतंच महागात पडलं नको ते धाडस..Shocking Video

मगरीच्या पाठीवर बसून जबडा उघडण्याचा केला प्रयत्न; व्यक्तीला भलतंच महागात पडलं नको ते धाडस..Shocking Video

मगरीच्या पाठीवर बसून जबडा उघडण्याचा केला प्रयत्न; व्यक्तीला भलतंच महागात पडलं नको ते धाडस..Shocking Video

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की दोन मोठ्या मगरी अगदी शांत बसून आराम करत आहेत. इतक्यात एक व्यक्ती हातात छोटी काठी घेऊन या मगरीच्या जवळ जातो आणि तिच्या पाठीवर बसतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 31 मार्च : कोणालाही भितीदायक प्राण्यांशी आपला सामना व्हावा, असं वाटत नाही. तुम्हाला मगरीजवळ जाऊन तिच्या वर बसायचं आहे असं जर कोणी सांगितलं तर तुम्ही काय कराल? कदाचित तुम्ही हसायला सुरुवात कराल आणि मग समोरच्या व्यक्तीला कदाचित बरंच सुनवालही. परंतु काही लोकांसाठी हा फक्त मजा करण्याचा खेळ आहे. एका वृद्ध व्यक्तीसोबत हाच निडरपणा दाखवण्याच्या नादात असा अपघात घडला, ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. स्मार्ट कुत्रा! तोंडात बास्केट घेऊन बाजारात पोहोचला; स्वतः खरेदी केल्या भाज्या, VIDEO पाहून व्हाल चकित या व्हिडिओमधील व्यक्तीने असं धक्कादायक काम केलं, ज्याचा विचार तुम्ही स्वप्नातही केला नसेल. धाडसीपणा आणि मूर्खपणा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एखादं धाडसी कृत्य करण्यासाठी माणसाला धैर्य आणि मेंदूची गरज असते. तर, स्वतःचा जीव धोक्यात घालून नको ते साहस दाखवण्याला मूर्खपणा म्हणतात. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्राणीसंग्रहालयातील मगरीच्या घेराबाहेर उभ्या असलेल्या गर्दीसमोर एक माणूस आपलं धैर्य दाखवायला जातो. मात्र पुढे जे घडतं ते अतिशय धक्कादायक आहे.

जाहिरात

या गर्दीत नको ते धाडस दाखवणं या व्यक्तीला चांगलंच महागात पडतं. काहीच वेळात त्याला आपल्या कर्माचं फळ मिळतं. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की दोन मोठ्या मगरी अगदी शांत बसून आराम करत आहेत. इतक्यात एक व्यक्ती हातात छोटी काठी घेऊन या मगरीच्या जवळ जातो आणि तिच्या पाठीवर बसतो.

News18लोकमत
News18लोकमत

आपले शौर्य दाखवत, तो माणूस मगरीचा जबडा उघडत तिच्या मानेवर थोपटतो. दरम्यान, मागून दुसरी मगर येते आणि ती हल्ला करण्याच्या बेतात दिसते. ही बाब त्या व्यक्तीलाही जाणवते आणि बचावासाठी तो मगरीच्या पाठीवरुन उठतो. दुसरी मगर आपला जबडा उघडून त्या माणसाला चावण्याचा प्रयत्न करते, पण तो उभा राहतो आणि तिथून निघून जातो. या व्यक्तीचं पूर्ण लक्ष दुसऱ्या मगरीवर असतं. इतक्यात पहिली मगर बदला घेत या व्यक्तीच्या पायावर हल्ला करते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात