नवी दिल्ली 14 मार्च : सिंह हा खरंतर जंगलाचा राजा आहे, मात्र एखादा प्राणी पूर्ण हिमतीने सिंहासोबत भिडला तर हा प्राणीही लवकरच हार मानतो. सहसा तुम्ही जंगलाचा राज सिंहाचं हिंस्त्र रूपच पाहिलं असेल. मात्र सध्या इंटरनेटवर व्हायरल होणारा व्हिडिओ अतिशय वेगळा आहे. यात जंगलाचा राजा सिंह इतका घाबरलेला दिसतो (Lion Afraid of buffalo herd Climbs On Tree), की हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही (Viral Video of Lion).
चवताळलेल्या अस्वलाचा ट्रेनरवर हल्ला; सर्कसमध्ये उडाला गोंधळ, Shocking Video
आपलं धाडस आणि हिंस्त्र स्वभावासाठी प्रसिद्ध असलेला सिंह तुम्ही आतापर्यंत प्राण्यांना घाबरवतानाच पाहिला असेल. मात्र यावेळी सिंहासोबत जे काही घडलं ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल. यात सिंह दुसऱ्या प्राण्यावर हल्ला करताना किंवा काहीही गोंधळ करताना दिसत नाही, तर तो स्वतःच आपला जीव वाचवण्यासाठी झाडावर चढताना दिसतो.
View this post on Instagram
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये म्हशींचा एक गट सिंहाच्या जवळ येताना दिसतो. इतक्या मोठ्या प्रमाणात समोर आलेल्या म्हशींचा गट पाहून जंगलाच्या राजालाही घाम फुटतो आणि घाबरून तो झाडावर चढतो. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ wild_animal_shorts_नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, 'म्हशींच्या कळपापासून वाचण्यासाठी सिंह झाडावर चढला'. हा व्हिडिओ पाहून अनेक लोक हैराण झाले तर अनेकांनी हे एकतेचं बळ असल्याचं सांगितलं.
म्हशींचा एवढा मोठा कळप पाहून सिंहही घाबरला. झाडावर चढल्यावरही सिंह घाबरलेलाच दिसत होता. इतका हिंस्त्र प्राणी आपला जीव वाचवण्यासाठी इतका घाबरलेला पाहून कोणालाही अतिशय अजब वाटेल, कारण शिकार करताना सिंह अजिबातही दया दाखवत नाही. हा व्हिडिओ 21 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. तर अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.