मराठी बातम्या /बातम्या /Viral /

मोबाईलच्या कव्हरमुळे मृत्यूच्या दाढेतून परत आला व्यक्ती; गोळीबार होऊनही वाचला जीव

मोबाईलच्या कव्हरमुळे मृत्यूच्या दाढेतून परत आला व्यक्ती; गोळीबार होऊनही वाचला जीव

जीवघेण्या हल्ल्यात या व्यक्तीवर गोळीबार झाला. मात्र, ही गोळी त्याला न लागता त्याच्या फोनच्या कव्हरमध्येच अडकली (Bullet Stuck In Phone Cover). यामुळे त्याचा जीव वाचला.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 12 ऑक्टोबर : अनेकदा असं म्हटलं जातं, की माणसाचं नशीब चांगलं असेल तर अगदी मोठी अडचणही सहजरित्या तो पार करतो. मग तो मृत्यूही असो. अनेकजण मृत्यूच्या दारातून परत आल्याचं आपण ऐकलं असेल. सध्या ब्राझीलमधील (Brazil) अशाच एका नशीबवान व्यक्तीची चांगलीच चर्चा रंगली आहे. हा व्यक्तीदेखील मृत्यूच्या दारातून परत आला. जीवघेण्या हल्ल्यात या व्यक्तीवर गोळीबार झाला. मात्र, ही गोळी त्याला न लागता त्याच्या फोनच्या कव्हरमध्येच अडकली (Bullet Stuck In Phone Cover). यामुळे त्याचा जीव वाचला.

VIDEO - छोट्याशा मांजराला घाबरला चित्ता; शिकार करायला गेला आणि स्वतःच पळाला

ही घटना ७ ऑक्टोबरची असल्याचं समोर आलं आहे. या व्यक्तीला लगेचच पेट्रोलिना शहरातील युनिव्हर्सिटीमध्ये अॅडमिट केलं गेलं. इथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. या व्यक्तीची ओळख लपवली गेली आहे. पोलिसांनी सांगितलं की ७ ऑक्टोबरला या व्यक्तीवर काही चोरांनी गोळीबार केला होता. यातील एक गोळी त्याच्या छातीजवळ लागली. मात्र, या व्यक्तीच्या खिशात मोबाईल होता. यामुळे गोळी मोबाईलच्या कव्हरमध्येच जाऊन अडकली. या व्यक्तीनं आपल्या मोबाईलमध्ये हल्कचा कव्हर लावला होता. यामुळे गोळी यात अडकली आणि व्यक्तीचा जीव वाचला.

Lad Bible नावाच्या स्थानिक वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार, या घटनेत व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्याआधी चोरांनी त्याला लुटण्याचा प्रयत्न केला होता. या व्यक्तीनं याचा विरोध केल्यानं त्याच्यावर गोळीबार केला गेला. गोळीबार करून चोरांनी तिथून पळ काढला. अद्याप आरोपींची ओळख पटलेली नाही. लवकरच या आरोपींना पकडून तुरुंगात टाकू असा दावा पोलिसांनी केला आहे.

कॉफी न आवडल्यानं भडकला पोलीस; महिला वेट्रेससोबत जे केलं ते वाचून बसेल धक्का

या व्यक्तीवर उपचार करणारे डॉक्टर कार्वाल्हो यांनी सांगितलं, की मोबाईलच्या कव्हरमुळे या व्यक्तीचा जीव वाचला आहे. कार्वाल्हो यांनी मोबाईलच्या झालेल्या अवस्थेचे फोटो शेअर केले आहेत. ट्विटरवर हे फोटो शेअर कऱण्यात आले असून सध्या ते चांगलेच व्हायरल होत आहेत. ब्राझीलमध्ये अशा प्रकारचा गोळीबार सामान्य आहे. 2020 मध्ये इथे २ लाख नवीन बंदुका रजिस्टर केल्या गेल्या.

First published:

Tags: Mobile Phone, Viral news