मराठी बातम्या /बातम्या /Viral /OMG! छोट्याशा मांजराला बलाढ्य चित्ताही घाबरला; शिकार करायला गेला आणि स्वतःच पळाला

OMG! छोट्याशा मांजराला बलाढ्य चित्ताही घाबरला; शिकार करायला गेला आणि स्वतःच पळाला

चित्ता आणि जंगली मांजर आमनेसामने आले आणि...

चित्ता आणि जंगली मांजर आमनेसामने आले आणि...

चित्ता आणि जंगली मांजर आमनेसामने आले आणि...

  मुंबई, 12 ऑक्टोबर : चित्ता (Cheetah video) हा चपळ आणि वेगवान प्राणी. आपली शिकार एका उडीतच पकडतो. चित्त्याला माणसं तर घाबरतातच पण भल्याभल्या प्राण्यांचंही त्याच्यासमोर काही चालत नाही. चित्ता दिसताच किती तरी प्राणी आपला जीव वाचवण्यासाठी धूम ठोकतात (Animal video). पण ज्या चित्त्याला पाहून इतर प्राणी घाबरतात तोच चित्ता एका छोट्याशा मांजराला (Serval cat video) पाहून घाबरला आहे.

  चित्ता आणि जंगली मांजराचा (Serval cat vs cheetah video) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. चित्ता आणि जंगली मांजर दोघंही एकमेकांसमोर आले तर साहजिकच जंगली मांजर घाबरेल अशी आपल्याला वाटेल. पण झालं उलटंच. जंगली मांजर चित्त्याला घाबरलं नाहीच उलट चित्ताच त्या मांजराला घाबरला. जंगली मांजराने निर्भीडपणे भल्यामोठ्या चित्त्याचाही सामना केला.

  व्हिडीओत पाहू शकता एका रस्त्याच्या मधोमध चित्ता आणि जंगली मांजर आमनेसामने आहे. तसं चित्त्याला पाहताच जंगली मांजराने धूम ठोकणं अपेक्षित होतं. पण तसं नाही झालं. उलट हे मांजर चित्त्याचा सामना करण्यासाठी सज्ज झालं. चित्ताही जंगली मांजरावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. हळूहळू तो मांजराजवळ जातो. तेव्हा चित्त्याकडे गप्प पाहत राहिलेलं मांजर मोठ्याने ओरडत चित्त्यावरच हल्ला केल्यासारखं करतं. तेव्हा चित्तासुद्धा थोडा दचकतो. मांजराला पाहून तो घाबरतो आणि थोडा मागेही जातो.

  हे वाचा - अद्भुत! अंगावर पाणी पडताच रंग बदलतो हा मासा; कधीच पाहिला नसेल असा VIDEO

  चित्ता आणि मांजरातील हा थरार काही पर्यटकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला. त्यांनी हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

  First published:

  Tags: Viral, Viral videos, Wild animal