मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Shocking: कॉफी न आवडल्यानं भडकला पोलीस; महिला वेट्रेससोबत जे केलं ते वाचून बसेल धक्का

Shocking: कॉफी न आवडल्यानं भडकला पोलीस; महिला वेट्रेससोबत जे केलं ते वाचून बसेल धक्का

एका पेट्रोल पंपावरील कॉफी शॉपमध्ये एक पोलीस कर्मचारी कोल्ड कॉफी पिण्यासाठी गेला. तिथे उपस्थित महिला वेट्रेसनं (Waitress) त्याच्याकडून ऑर्डर घेतली आणि त्याची कॉफी आणण्यासाठी गेली

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 12 ऑक्टोबर : जगभरात कॉफी प्रेमींची (Coffee Lovers) संख्या भरपूर आहे. थंडीच्या दिवसात किंवा थकलेलं असताना हॉट कॉफी (Hot Coffee) आणि उन्हाळ्यात कोल्ड कॉफी (Cold Coffee) मिळाली तर लोकांची खराब दिवसही चांगला बनतो. कॉफी प्रेमी आपल्या कॉफीमध्ये दूध, साखर आणि कॉफी अगदी बरोबर मापात असावी, याची विशेष काळजी घेतात. अशात त्यांना खराब कॉफी प्यायला दिली, तर ते प्रचंड रागवतात. एका पोलीस कर्मचाऱ्यासोबतही असंच घडलं. अतिशय खराब कॉफी पिण्यास मिळाल्यानं हा पोलीस रागवला. यानंतर त्यानं जे काही केलं ते हैराण कऱणारं होतं.

VIDEO : प्रेयसीला लग्नासाठी मागणी घालत असतानाच झाली तिसऱ्याची एण्ट्री अन्...

उत्तरी स्पेनमधील पँपलोना शहरातील या घटनेनं सर्वांनाच हैराण केलं. जुलै 2019 मध्ये पँपलोनाच्या एका पेट्रोल पंपावरील कॉफी शॉपमध्ये एक पोलीस कर्मचारी कोल्ड कॉफी पिण्यासाठी गेला. तिथे उपस्थित महिला वेट्रेसनं (Waitress) त्याच्याकडून ऑर्डर घेतली आणि त्याची कॉफी आणण्यासाठी गेली. जेव्हा ती कॉफी घेऊन आली तेव्हा हा पोलीस अतिशय उत्साही होता. मात्र, पहिला घोट पिताच त्याने ही कॉफी थुंकली. पोलिसाने कॉफी खराब असल्याची तक्रार करताच महिलाही त्याच्यासोबत भांडू लागली.

दोघांमध्येही कॅफेमध्येच वाद सुरू झाला. पोलिसानं पाहिलं की आसपासचे लोक पाहात आहेत. पोलिसानं बाहेर येऊन हळू आवाजात बोलण्यास महिलेला सांगितलं. मात्र, तिनं ऐकलं नाही. खराब कॉफी आणि महिलेच्या या वागण्यामुळे वैतागलेल्या पोलिसानं तिला लगेचच अटक केली (Angry Police Officer Arrested Waitress)

VIDEO : लग्नात स्टेजवरच भिडले नवरी-नवरदेव; पाहुण्यांनाही समजेना हसावं की रडावं

पोलीस कर्मचाऱ्यानं या गोष्टीवरुन महिलेला अटक केल्यानं अधिकारीही नाराज झाले आणि त्याला सहा महिन्यांसाठी सस्पेंड केलं. मात्र, जेव्हा प्रकरण कोर्टात पोहोचलं, तेव्हा कोर्टानं या महिलेला केलेली अटक योग्य असल्याचं म्हटलं. कोर्टाने म्हटलं, की महिलेनं केलेलं हे वर्तन अतिशय चुकीचं आहे. ती शांतता भंग करत होती, त्यामुळे तिला अटक करण्याचा निर्णय अगदी योग्य होता. कोर्टानं म्हटलं की पोलीस तेव्हा याठिकाणी ग्राहक म्हणून गेला होता आणि एखादा पदार्थ न आवडल्यास तक्रार करण्याचा हक्क ग्राहकाला आहे. मात्र, महिलेनं ओरडून हे प्रकरण वाढवलं.

First published:

Tags: Coffee, Viral news