VIDEO भुकेने तडफडत बछड्याने सोडला जीव; पुढे बिबट्याने जे केलं ते पाहून हादराल

VIDEO भुकेने तडफडत बछड्याने सोडला जीव; पुढे बिबट्याने जे केलं ते पाहून हादराल

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू भूकेमुळे झाला आहे. त्याला कित्येक दिवसांपासून शिकार मिळाली नसल्याने त्याचा भूकबळी गेला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : जंगलात प्राण्यांना जगण्यासाठी मोठा संघर्ष (Life of Jungle) करावा लागतो. कोणाला आपली भूक भागवण्यासाठी शिकार करावी लागते, तर कोणाला आपला जीव वाचवण्यासाठी लढावं लागतं. सोशल मीडियावर (Social Media) प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एका बिबट्याचा त्याच्या बछड्याचा मृत्यू झाल्यानंतरचा व्हिडीओ समोर आला आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू भूकेमुळे झाला आहे. त्याला कित्येक दिवसांपासून शिकार मिळाली नसल्याने त्याचा भूकबळी गेला आहे. हा व्हिडीओ लाईफ अँड नेचर नावाच्या ट्वीटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्स भावनिक प्रतिक्रिया देत आहेत.

व्हिडीओमध्ये बिबट्या जंगलात दु:खी उभा असल्याचं दिसतंय. काही अंतरावर बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला आहे. बिबट्याही अनेक दिवसांपासून भुकेला असल्याचं दिसतंय. काही वेळात बिबट्या, त्या पिल्लाजवळ जातो त्याला स्पर्श करतो आणि त्यानंतर पिल्लाला आपल्या जबड्यात ठेऊन दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो.

(वाचा - घोड्यामुळे नवरदेवाला पळता भुई झाली थोडी, लग्नादिवशीच जखमी झाला तरुण; पाहा VIDEO)

(वाचा - जबड्यात धरून खेचत पाण्याबाहेर आणलं; बिबट्यानं मगरीची केली शिकार; पाहा VIDEO)

भुकेने ग्रासलेल्या बिबट्याकडे कोणताच पर्याय उरला नसताना त्याने आपल्याच बछड्याला खायला सुरुवात केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी भावूक प्रतिक्रिया दिली आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: February 26, 2021, 8:52 PM IST

ताज्या बातम्या