नवी दिल्ली, 07 फेब्रुवारी : सिंह जसा जंगलाचा राजा मानला जातो. तसंच मगरही पाण्यातील एखाद्या राजापेक्षा कमी नाही. पण तरीही पाण्यात उडी मारून एका बिबट्याने भल्यामोठ्या मगरीची शिकार केली आहे. पाण्यात वर्चस्व असलेल्या मगरीची शिकार होतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मगर पाण्यातील राजा मानली जाते. तर, जमिनीवरील बिबट्या कोणाचीही शिकार करू शकतो. दोघेही आपापल्या भागात 'शेर' आहेत. पण बिबट्याच्या ताकदीपुढे मगरीचाही निभाव लागला नाही. असाच बिबट्याने मगरीच्या केलेल्या शिकारीचा व्हिडीओ समोर आला आहे.
व्हिडीओमध्ये मगर नदीत विहार करताना दिसतेय. दुसरीकडे नदीपासून काही उंचीवर बिबट्या बसलेला दिसतोय. बिबट्या नदीतील आपली शिकार पाहतो आणि अचानक उंचावरून उडी मारून पाण्यातील मगरीवर झडप घालतो. एका झडपेत तो मगरीला जबड्यात धरून पाण्यातून वर आणतो. बिबट्याची जबर झडप भल्यामोठ्या मगरीलाही भारी पडते. पाण्यातून वर येताना मगर त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी प्रतत्न करताना दिसतेय. पण मजबूत पकड असलेल्या बिबट्याच्या जबड्यातून ती वाचू शकत नाही.
The best of the best crocodile hunter!
That is a Jaguar hunting on a Caiman croc. pic.twitter.com/efUA8ojfsM — Sudha Ramen IFS 🇮🇳 (@SudhaRamenIFS) January 16, 2021
भारतीय वन सेवेत असणाऱ्या सुधा रामेन यांनी त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरून 'crocodile hunter' अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ शेअर केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral videos