मराठी बातम्या /बातम्या /Viral /

घोड्यामुळे नवरदेवाला पळता भुई झाली थोडी, लग्नादिवशीच जखमी झाला तरुण; पाहा VIDEO

घोड्यामुळे नवरदेवाला पळता भुई झाली थोडी, लग्नादिवशीच जखमी झाला तरुण; पाहा VIDEO

एका गावात लग्नसमारंभावेळी घडलेल्या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. लग्नात घोड्यावर बसलेल्या नवऱ्यासोबत असं काही घडतं की सर्वच जण त्या घटनेने हैराण होतात. नवरा मुलगा घोड्यावर बसलेला असताना घोडा अचानक उधळतो आणि पळू लागतो.

    पाटण, 17 फेब्रुवारी : अनेकदा काही गोष्टी आपल्या हाताबाहेर जातात आणि आपण पाहत असूनही काहीही करू शकत नाही. अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. एका गावात लग्नसमारंभावेळी घडलेल्या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. लग्नात घोड्यावर बसलेल्या नवऱ्यासोबत असं काही घडतं की सर्वच जण त्या घटनेने हैराण होतात. नवरा मुलगा घोड्यावर बसलेला असताना घोडा अचानक उधळतो आणि पळू लागतो. गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील हारिज तहसील येथील एका गावात नवरा मुलगा घोड्यावर बसला होता. सर्व बाराती नाच-गाण्यात मग्न होतं. घोड्याकडूनही गोष्टी केल्या जात होत्या. पण त्याचवेळी घोड्याचं संतुलन बिघडलं आणि घोडा नाचणाऱ्या बारातींमधून सैरावैरा पळू लागला. घोड्याचा मालक त्या घोड्याला आवरण्याचा प्रयत्न करतो, परंतु संतुलन बिघडून उधळलेला घोडा त्याला आवरत नाही. सर्व बारातींमधूनच घोडा नवऱ्या मुलाला घेऊन सुसाट पळू लागला. लग्नातले लोकही त्या घोड्यामागे पळू लागले. परंतु घोडा इतक्या वेगात पळत होता की, कोणलाही त्याला गाठता आलं नाही. घोड्यावर बसलेल्या नवऱ्या मुलाला घोडेस्वारी येत नव्हती. घोडा वेगाने पळत असल्याने काही अंतरापर्यंत नवरदेव त्यावर कसाबसा टिकून होता. परंतु काही वेळात घोड्याने अधिकच वेग पकडल्याने नवरदेव त्या घोड्यावर स्वत:ला सावरू शकला नाही आणि संतुलन बिघडल्याने काही अंतरावर जाऊन नवरदेव घोड्यावरुन पडला. या संपूर्ण घटनेत नवरदेव किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान, लग्नात सर्वांची मजा-मस्ती सुरू असताना झालेल्या घटनेने सर्वच जण हैराण आहेत. गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील एका गावात लग्नसमारंभावेळी घोडा उधळल्याची घटना घडली. नवरदेव घोड्यावर बसलेला असताना, घोडा सैरावैरा पळू लागला. अचानक झालेल्या या घटनेने सर्वच बाराती हैराण आहेत.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Bridegroom, Marriage, Social media, Twitter

    पुढील बातम्या