नवी दिल्ली, 23 मे : बिबट्या सर्वात चपळ प्राणी मानला जातो. बिबट्या (Leopard) डोळ्यांची पापणी हलते न हलते तोच एखाद्या प्राण्याची शिकार करतो. तो आपल्या शिकारीच्या शोधात अनेकदा झाडावरही चढतो. एवढंच नाही, तर बिबट्या प्राण्याची शिकार केल्यानंतर तीदेखील झाडावर घेऊन चढतो, जेणेकरुन त्याची शिकार दुसरा कोणता प्राणी घेऊ नये. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल (Social Media) झाला आहे, ज्यात बिबट्या शिकारीच्या शोधात आधी एका झाडावर चढतो, त्यानंतर त्याला हरणांची एक झुंड दिसते आणि तो झाडावरुन खाली उतरतो.
व्हिडीओमध्ये एका जंगलात एक बिबट्या शिकारीच्या शोधात एका उंच झाडावर चढल्याचं दिसतंय, जेणेकरुन तो दुरवर असलेली शिकार पाहू शकेल. त्याचवेळी त्याची नजर एका हरणांच्या झुंडवर जाते आणि तो झाडावरुन खाली उतरुन हरणांच्या झुंडीकडे चालू लागतो. खाली उतरुन तो हरणांवर झडप घालतो.
त्यावेळी इतर प्राणी बिबट्याला पाहून घाबरुन इथे-तिथे पळू लागतात. परंतु बिबट्याला हरणाची शिकार करायची असल्याने, तो हरणांच्या झुंडीकडे वेगात पळतो. त्या झुंडीतील काही हरणांना बिबट्या त्यांच्यावर हल्ला करणार असल्याचा अंदाज येतो आणि ते वेगाने जागा मिळेल तिथे पळू लागल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय.
परंतु बिबट्या वेगाने त्यापैकी एका हरणावर झडप घालतोच आणि त्याला पकडतो. बिबट्या वेगाने धावत येतो आणि उंच उडी घेत हिरणावर झडप घालत त्याला जमिनीवर पाडतो. हरण बिबट्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतं, परंतु त्याचे प्रयत्न यशस्वी होत नाही.
हा व्हिडीओ National Geographic ने शेअर केला असून या व्हिडीओला आजवर अनेक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Deer, Leopard, Viral videos