कोण सर्वात शक्तिशाली? हल्ला करणाऱ्या बिबट्याला कुत्र्याने लावलं पळवून, पाहा VIDEO

कुत्रा आणि बिबट्याचा एक जूना व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतआहे. यामध्ये चक्क कुत्र्याने बिबट्याबरोबर पंगा घेतला आहे

कुत्रा आणि बिबट्याचा एक जूना व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतआहे. यामध्ये चक्क कुत्र्याने बिबट्याबरोबर पंगा घेतला आहे

  • Share this:
    राजस्थान, 22 जून : कुत्रा आणि बिबट्याचा एक जूना व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतआहे. यामध्ये चक्क कुत्र्याने बिबट्याबरोबर पंगा घेतला आहे. काही दिवसांपूर्वीचा हा व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर हिट ठरत आहे. माजी इंडियन फॉरेस्ट ऑफिसर दिग्विजय सिंह खाती यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी असं कॅप्शन दिले आहे की, हा व्हिडीओ राजस्थानमधील एक जुना व्हिडीओ आहे. त्यांनी असा प्रश्न विचारला आहे की, कोण जास्त ताकदवर आहे? पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर खरच असा प्रश्न पडतो की कोण जास्त शक्तिशाली आहे. कारण एरवी ज्याला सगळे घाबरून असतात त्या बिबट्याला चक्क कुत्र्याने पळवून लावले आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एका जंगल सफारीच्या गाडीसमोर एक कुत्रा झोपला आहे. तेव्हा एक बिबट्या जंगलातून बाहेर पडत कुत्र्यावर हल्ला करतो. तो त्याच्यावर झपट मारण्याचा प्रयत्न करतो. (हे वाचा-जिराफाशी पंगा नकोच! गाडीचा पाठलाग करतानाचा VIDEO पाहून नेटिझन्स थक्क) मात्र कुत्रा बहाद्दुरी दाखवतो आणि त्या बिबट्याच्या अंगावर भुंकायला सुरुवात करतो. कुत्र्याचं वारंवर भुंकणं बघून चक्क बिबट्या तिथून पळ काढतो. हा व्हिडीओ जुना असला तरीही सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. पाच हजारांपेक्षा जास्त वेळा हा व्हिडीओ पाहण्यात आला आहे. दरम्यान अनेकांनी यावर कमेंट करत कुत्र्याच्या शक्तीचं कौतुक केलं आहे. काहींच्या प्रतिक्रिया देखील खूप मजेशीर आहेत. (हे वाचा-VIDEO : अगदी शांतपणे पकडला सिंकमध्ये आलेला भलामोठा पायथॉन, नेटकरी आश्चर्यचकित) (हे वाचा-भुंकणाऱ्या कुत्र्याला लाथ मारायला गेला तरुण, काय घडलं पाहा VIDEO)
    First published: