हा पराक्रम करण्याआधी त्याने बाटलीतील द्रव तोंडात ओतलं आणि नंतर दुसऱ्या हातात धरलेलं जळतं लाकूड तोंडाजवळ आणलं. त्याने आगीवर फुंकर मारली आणि हवेत धगधगत्या ज्वाळा उठताना दिसल्या. हे पाहून ती व्यक्तीही आपल्या तोंडातून ज्वाला बाहेर काढत असल्याचं वाटतं. मात्र प्रत्यक्षात असं नाही. या व्यक्तीने हे कसं केलं ते आम्ही तुम्हाला सांगतो. व्हिडिओच्या सुरुवातीला तो जो पदार्थ पिताना दिसत आहे तो ज्वलनशील आहे. सामान्यतः हा पदार्थ पॅराफिन असतो किंवा ते शुद्ध तेल असतं. हे तोंडातून स्प्रेप्रमाणे बाहेर सोडल्यावर त्याला आग लागते आणि ती आग हवेत पसरते. पंजाबी लग्नातील गाण्यांचा आवाज बंद करण्यासाठी गेलेले पोलीस; पुढे जे घडलं ते पाहून वाटेल आश्चर्य, VIDEO बातमी देईपर्यंत व्हिडिओ हजारो व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून सगळेच थक्क झाले आहेत. हा अतिशय घातक स्टंट आहे आणि हे करण्याआधी अनेक वर्ष त्याचा सराव केला जातो. अशात हा स्टंट घरी करून पाहाणं धोकादायक ठरू शकतं. यामुळे जीव जाण्याचाही धोका आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fire, Shocking video viral