मुंबई, 09 फेब्रुवारी : सोशल मीडियावरती कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. पण सोशल मीडियापर्यंत सगळं ठिक आहे. पण आता तर उत्तरप्रदेशात माकडाचे फोटो व्हायरल होताना पाहायला मिळतात. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये बहुतांश ठिकाणी माकडाचे फोटो लावले गेले आहेत. अगदी होर्डिंग्सपासून ते इतर ठिकाणी देखील माकडाचे फोटो लावले गेले आहेत. जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि नक्कीच मनात प्रश्न उभा राहिल की असं का? खरंतर या मागचं कारण आणखी आश्चर्य कारक आहे.
खरंतर या भागात माकडांची दहशत आहे. माकड वस्तीत येऊन खूप जास्त त्रास देतात. त्यामुळेच हे फोटो लावले गेले आहेत. इतकंच नाही तर येथे सेन्सर मशीन देखील लावले गेले आहे. जे माकडांना पळवण्यासाठी उपयोगाच्या आहेत.
हे ही पाहा : Viral Video : मंदिरात अचानक शिरलं भलंमोठं अस्वल, भाविकांनी जे केलं ते पाहतच रहाल...
याबाबत अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, बसस्थानकावर माकडाचे छायाचित्रे लावून सेन्सर मशीन बसवल्याने येथील माकडांची दहशत कमी झाली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, पूर्वी येथे माकडांची खूप दहशत होती.
माकडांना हाकलण्याचा अनोखा मार्ग
माकडांच्या उपद्रवामुळे मुरादाबादमधील परिवहन महामंडळाने ठिकठिकाणी माकडाचे मोठे पोस्टर लावले आहेत. झाडे, खांब, भिंती आणि छतावरही हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. बसस्थानकात सेन्सर मशिनही बसवण्यात आल्या आहेत, जेणेकरून माकडांना येथून हाकलता येईल.
सेन्सर मशीन कसे काम करते?
मुरादाबाद बसस्थानकात बसवण्यात आलेल्या सेन्सर मशिनजवळ माकडे येताच तेथून गोळीबाराचे आवाज येऊ लागले. यामुळे माकडे येथून पळून जातात.
उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दररोज सुमारे 1020 हजार प्रवासी बसस्थानकावर पोहोचतात. अशा स्थितीत माकडांमुळे त्यांची सुरक्षा धोक्यात आली होती. त्यामुळे बसचेही नुकसान होऊ शकते.
उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाचे बीएल मिश्रा यांनी सांगितले की, ही पद्धत दुसऱ्यांदा वापरण्यात आली आहे. येथे लोकांमध्ये माकडांची भीती खूप जास्त होती. त्यानंतर आम्ही केलेला हा उपाय देखील प्रभावी ठरला आहे. त्यांनी सांगितले की आता बसस्थानकात माकडे येणे बंद झाले आहे.
हे ही पाहा : बिबट्याच्या शिकारीचा व्हिडीओ व्हायरल, पण शिकार मात्र चुकला, स्वत:ची शेवटी पकडली आणि...
आता वाहतूक विभागाने उत्तर प्रदेश सरकारकडे माकडांपासून सुटका करण्यासाठी अशा आणखी सेन्सर मशीनची मागणी केली आहे.
याठिकाणी माकडांची प्रचंड भीती असल्याचे येथील बसस्थानकावरील एका दुकानदाराने सांगितले. त्याच्या दुकानातील माल माकडे पळवून नेत असे. त्यानंतर आता हे पोस्टर्स लावण्यात आल्यापासून येथे माकडांचा उपद्रव कमी झाला आहे. माकडं इथल्या प्रवाशांनाही त्रास देत असल्याचं त्यांनी सांगितलं. परंतु आता हा प्रकार कमी झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking news, Social media, Top trending, Viral