नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी : जगभरात अनेक ठिकाणी बऱ्याच निरनिराळ्या गोष्टी घडत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला या गोष्टी सहजरित्या पहायला मिळतात. सोशल माध्यमांवर अनेक फोटो व्हिडीओ व्हायरल होत असतात. आपण विचारही केला नसेल अशा गोष्टी घडत असतात. सध्या असाच काहीसा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की, एक अवाढव्य अस्वल मंदिरात आलं आहे. त्याच्यासोबत त्याचं छोटं बाळही आहे. अस्वल मंदिरात आल्याचं पाहताच तेथील भाविकांनी त्याला चक्क कोल्डिंग्स प्यायला दिले आहेत. तहानलेल्या अस्वलाने अगदी काही सेकंदातच दोन कोल्ड्रिंग्सच्या बॉटल खाली केल्या. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चांगलाच चर्चेत आला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर 4 लाख 66 हजारांहून अधिक लाईक्स आणि 31 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओ पाहून अनेक यूजर्सनी याला देवाचा महिमा असे वर्णन केले आहे. त्याच वेळी, बहुतेक वापरकर्त्यांनी या अस्वलाचे वर्णन भगवान जामवंताचे रूप म्हणून केले आहे. त्याचवेळी काही युजर्सनी अस्वलाला अशा प्रकारे कोल्ड्रिंक देणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, अस्वल हा अतिशय रागीट प्राणी आहे, जो जंगलात त्याच्या हद्दीत राहतो. ते झाडांवर चढण्यात निपुण असतात आणि जे त्यांच्या हद्दीत जंगलात घुसतात त्यांच्यावर हल्ला करतात आणि त्यांना गंभीर जखमी करतात. अनेक वेळा माणसांशी सामना करूनही तो हल्ला करायला मागेपुढे पाहत नाही. त्यांची तीक्ष्ण नखे एखाद्या व्यक्तीला सहजपणे इजा करू शकतात. मात्र व्हिडीओमध्ये ते अतिशय शांत दिसत अजून कोणालाही इजा पोहचवत नाहीये.