नवी दिल्ली 23 सप्टेंबर : आपलं शहर सोडून दुसऱ्या शहरात शिकण्यासाठी जाणं सोपं नसतं. विद्यार्थ्यांसमोर अशावेळी सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे घर. कॅनडाच्या (Canada) टोरंटो (Toranto) येथे मेडिकल स्टूडंट (Medical Student) कॅडिंस बॉल हिच्यासोबतही असंच घडलं. शिक्षणासाठी याठिकाणी गेलेल्या या तरुणीला राहण्यासाठी घर शोधताना एका विचित्र गोष्टीचा सामना करावा लागला. कॅडिंस बॉलनं नुकतंच ओंटारियोच्या (Ontario) वेस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये (Western University) मेडिकल सायनसच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. The Sun च्या वृत्तानुसार, कॅडिंसनं राहण्यासाठी ऑनलाईन साईटवर घर शोधलं. ही डील पूर्णपणे फायनलही झाली. रेंट अॅग्रीमेंटही तयार होतं. मात्र, यानंतर अशा कारणामुळे तिला हे घर सोडावं लागलं, ज्याची तिनं कल्पनाही केलेली नव्हती. काय सांगता! स्वतःचं घर विकून कर्मचाऱ्यांना दिली 51 लाखांपर्यंतची पगारवाढ कॅडिंस बॉलच्या घरमालकानं अचनाकच हे अॅग्रीमेंट कॅन्सल झाल्याचं म्हटलं. तरुणीनं याच कारण विचारलं आणि काही अडचण असेल तर चर्चा करून सोडवू असंही म्हटलं. मात्र, घरमालक काहीही ऐकायला तयार नव्हता. इतकंच नाही तर लवकरात लवकर हे घर सोडअसंही त्यानं तरुणीला सांगितलं. घरमालकानं याचं कोणतंही कारण तिला सांगितलं नाही. …अन् लाईव्हदरम्यान धाडकन कोसळली रिपोर्टर; कॅमेऱ्यात कैद झालं शॉकिंग दृश्य अखेर या तरुणीला हे घर रिकामं करावं लागलं. मात्र, नंतर तिला घरमालकानं आपल्याला घरातून बाहेर का काढलं, याचं कारण समजलं. घरमालकाला आपल्या हातावरील टॅटू (Tattoo) आवडत नसल्यानं त्यानं हे केल्याचं तिनं सांगितलं. या तरुणीच्या शरीरावर भरपूर टॅटू होते. हे टॅटू पाहून घरमालकाला भीती वाटत असे. अशात त्यांना रोज कॅडिंसला आपल्या समोर पाहण्याची इच्छा नव्हती. आपले टॅटूच आपल्यावरील एवढ्या संकटाचं कारण बनतील याचा या तरुणीनं कधी विचारही केला नव्हता. मात्र, घरमालकाच्या अजब वागण्यामुळे तिला बेघर व्हावं लागलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.