• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • काय सांगता! स्वतःचं घर विकून कर्मचाऱ्यांना दिली 51 लाखांपर्यंतची पगारवाढ; अमेरिकेतील या बॉसची जगभरात चर्चा

काय सांगता! स्वतःचं घर विकून कर्मचाऱ्यांना दिली 51 लाखांपर्यंतची पगारवाढ; अमेरिकेतील या बॉसची जगभरात चर्चा

या दिलदार बॉसचं नाव डॅन प्राईस (Dan Price) असं आहे.

 • Share this:
  अमेरिकेतील एका बॉसची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. कित्येक लोक असा बॉस आपल्याला मिळावा अशी इच्छा व्यक्त करत आहेत. याला कारणही तसंच आहे. या बॉसने एक ऐतिहासिक निर्णय घेत आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची मिनिमम सॅलरी 51 लाखांपर्यंत (Minimum wage 51 lakh) वाढवली आहे. ग्रॅव्हिटी पेमेंट्स (Gravity Payments) असं या कंपनीचं नाव आहे, आणि या दिलदार बॉसचं नाव डॅन प्राईस (Dan Price) असं आहे. अवघ्या 31 वर्षांचे डॅन या कंपनीचे सीईओ (Gravity Payments CEO) आहेत. त्यांचा हा निर्णय ऐकल्यानंतर कित्येकांनी यावर टीका केली होती. अशामुळे कंपनीचं दिवाळं निघेल असं सर्वांचं मत होतं. पण, डॅन यांनी दिलेल्या माहितीनुसार या निर्णयाचा खरं तर कंपनीला फायदा झाला आहे. वेतनवाढ केल्यानंतर कंपनीचे कर्मचारी खुश आहेत, आणि अधिक मन लावून काम करत आहेत असं डॅनने सांगितलं. एका कर्मचाऱ्यामुळे वाढला सर्वांचा पगार ग्रॅव्हिटी पेमेंट्स ही एक क्रेडिट कार्ड प्रोसेसिंग कंपनी आहे. एक दिवस डॅनला समजलं, की त्यांच्या कंपनीतील एका कर्मचाऱ्याला आपलं घर चालवण्यासाठी ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त दुसरं पार्ट टाईम कामही (Secretly doing part time job) करावं लागत आहे. यानंतर डॅनने आपल्या कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांची वेतनवाढ (minimum wage increased) करण्याचा निर्णय घेतला. कंपनीतील कर्मचाऱ्यांची मिनिमम सॅलरी ही अगदी थोडीथोडकी नाही, तर तब्बल 51 लाख (51 lakh increment) करण्यात आली. हे वाचा - कसं शक्य आहे? नर शार्कशिवायच झाला पिल्लाचा जन्म; 2 मादी माशांचा चमत्कार; शास्त्रज्ञही हैराण बॉसपासून कर्मचाऱ्यापर्यंत सारखाच पगार ऑफिसमधील दोन-दोन कामं करणाऱ्या कर्मचाऱ्याबाबत समजल्यानंतर डॅन यांनी एक मोठा निर्णय घेतला होता. त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांचा पगारवाढ करण्यासाठी आपलं दुसरं घर विकून (CEO sold his house) टाकलं. यासोबतच, स्वतःच्या पगारातही तब्बल सात कोटींची (CEO took 7 crore salary cut) कपात केली. यानंतर त्यांनी ऑफिसमधील सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन 51 लाख केले. सध्या डॅन यांना मिळणारा पगार, आणि कंपनीतील सर्वसाधारण कर्मचाऱ्याला मिळणारा पगार हे सारखंच, म्हणजे 51 लाख आहे. पगारवाढीचा झाला फायदा डॅनने हा निर्णय सहा वर्षांपूर्वी घेतला होता. तेव्हा सर्वांनी याचा कंपनीला तोटा होईल असं मत व्यक्त केलं होतं. मात्र, सहा वर्षांनंतरही ही कंपनी चांगल्या स्थितीमध्ये आहे. तोटा होण्याऐवजी डॅन यांच्या ऐतिहासिक निर्णयाचा कंपनीला फायदा झाला आहे. कंपनीचा केवळ टर्नओव्हरच नाही, तर कर्मचाऱ्यांची संख्याही वाढली आहे. तसेच, इथले कर्मचारी आता नोकरी सोडून जाण्याचा विचारही करत नाहीत. हे वाचा -  खबरदार! ऑफिसातल्या महिला कर्मचाऱ्यांना लव्ह, स्विटी, हनी म्हणाल तर जाईल नोकरी दी सन या वृत्तसंस्थेने दिलेल्या रिपोर्टनुसार, डॅनने कंपनीची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याचं म्हटलं आहे. 2020मध्ये कोरोना महामारीचा जगभरातील अनेक कंपन्यांना फटका बसला होता. यात ग्रॅव्हिटी पेमेंट्सचाही समावेश होता. मात्र, आता ही कंपनी पुन्हा पूर्वपदावर येत आहे. कोरोना काळात या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी स्वखुशीने आपलं वेतन कमी करण्याचा निर्णय घेतला होता, असंही डॅनने सांगितलं.
  First published: