• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • बापरे..! कोब्रा नागानं गिळली घोणस; विषारी सापाची दुसऱ्या विषारी सापाकडून शिकार

बापरे..! कोब्रा नागानं गिळली घोणस; विषारी सापाची दुसऱ्या विषारी सापाकडून शिकार

वेअरहाऊसमधून त्यांनी शिताफीनं विषारी कोब्रा नागाला पकडलं. त्यानंतर रिकाम्या जागेसाठी त्यांनी त्याला रस्त्यावर आणलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, कोब्रा नागाने काहीतरी गिळले आहे.

 • Share this:
  सागर, 13 सप्टेंबर : अत्यंत विषारी घोणस जातीच्या सापाची कोब्रा नागाने शिकार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गोडाउनमध्ये नाग घुसल्याची माहिती सर्प मित्राला दिल्यावर त्याने येऊन कोब्रा नाग पकडला. मात्र, विशेष म्हणजे त्याला धरून उलटे टांगल्यानंतर त्याने तोंडातून विषारी घोणस साप (cobra swallowing russell viper amazing snake fight) बाहेर काढला. हा प्रकार पाहून उपस्थित लोकांना धक्काच बसला. ही घटना मध्यप्रदेशच्या सागर गढकोटा रस्त्यावरील सनोढा येथील टोल नाक्याजवळील आहे. येथे एका गोडाऊनमध्ये कोब्रा साप पाहिल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी साप पकडणाऱ्या अकील बाबाला हाक मारली. साप पकडणाऱ्या अकील बाबाने साप पकडण्यास सुरुवात केली. वेअरहाऊसमधून त्यांनी शिताफीनं विषारी कोब्रा नागाला पकडलं. त्यानंतर रिकाम्या जागेसाठी त्यांनी त्याला रस्त्यावर आणलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, कोब्रा नागाने काहीतरी गिळले आहे. त्याला उलटा पकडल्यानंतर त्यानं घोणस साप आपल्या तोंडातून बाहेर काढण्यास सुरुवात केली. आणि त्यानंतर रस्त्यावर तोंडातून त्यानं पूर्ण गिळलेला घोणस साप बाहेर टाकला. हे दृश्य पाहून जमलेले सर्व लोक थक्क झाले. कोबरा नाग पकडला आणि नंतर त्याला जंगलात सोडून देण्यात आलं. कोब्रा नागाला सुरक्षितरित्या पकडलेले सर्पमित्र अकील बाबा यांनी सांगितले की, गोदामामध्ये मालाखाली एक मोठा कोब्रा साप होता. तो मी पकडला. हा जगातील सर्वात धोकादायक साप आहे. त्यानं घोणस जातीचा विषारी सापाला खाल्ले होते. नागाला पकडल्यानंतर त्यानं तोंडातून घोणसला बाहेर टाकलं.
  Published by:News18 Desk
  First published: