मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Knowledge News : DTH ची डिश तिरकीच का लावली जाते? तुम्हाला माहितीय यामागचं कारण?

Knowledge News : DTH ची डिश तिरकीच का लावली जाते? तुम्हाला माहितीय यामागचं कारण?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

आता लोक डीटीएच वापरु लागले आहे. ते केबल टीव्हीपेक्षाही चांगलं आहे. ज्यामध्ये तुम्हील तुमचा आवडीचा कार्यक्रम नंतर कधीही पाहू शकता. त्यामध्ये रेकॉर्डिंगसह आणखी वेगवेगळे फायदे आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 30 सप्टेंबर : एक काळ असा होता, जेव्हा टीव्ही पाहाण्यासाठी आपल्याला खूप जास्त मेहनत घ्यावी लागत होती. खरंतर तेव्हा टीव्ही ही अँटीवरती चालायची आणि आपण त्या अँटीनाला वेगवेगळ्या दिशेला फिरवून जगातील कोणत्या ही चॅनलचं सिग्नल घेऊ शकतो. आधी एक काळ होता, जेव्हा लोक तासनतास अँटीना हातात घेऊन उभे राहायचे आणि एकदा का सिग्नल आला की, मग तो अँटीना तसचं हातात घेऊन उभे राहायचे.

आता हे सगळं सोपं झालं आहे. आता फक्त एक बटण दाबला की आपण आपल्याला हवा तो चॅनल पाहू शकतो. आता बरेच लोक केबलवरती टीव्ही पाहातात, ज्यामुळे आपल्याला टीव्हीवर दिसणारे चित्र हे एकदम क्लिअर दिसतं. परंतू टेक्नोलॉजी जसजशी बदलत गेली, तसतसा त्यामध्ये गोष्टी बदलत गेल्या.

ज्यानंतर आता लोक डीटीएच वापरु लागले आहे. ते केबल टीव्हीपेक्षाही चांगलं आहे. ज्यामध्ये तुम्हील तुमचा आवडीचा कार्यक्रम नंतर कधीही पाहू शकता. त्यामध्ये रेकॉर्डिंगसह आणखी वेगवेगळे फायदे आहेत.

हे ही वाचा : इथे सूर्य खरंच पश्चिमेला उगवतो... कुठे आहे असं ठिकाण? वाचा सविस्तर

आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी आपल्या घरी डीटीएच लावला असेल. परंतू तुम्ही कधी असा विचार केलाय का की याची छत्री अशी तिरकी किंवा वाकडी का लावली जाते? चला ते जाणून घेऊ

डीटीएच छत्री तिरकी लावली जाते?

डीटीएच अँटेना हा सिग्नल कॅप्चर करते आणि आपल्या टीव्हीमध्ये त्याचं चित्रांमध्ये रूपांतरित करते. ते तिरकस करण्यामागील कारण म्हणजे त्याची रचना आणि कार्यप्रणाली.

हे ही वाचा : stupid question : 'भैया भाजी कशी दिली?'' तुम्ही देखील असे विचित्र प्रश्न विचारता का?

या छत्रीच्या तिरकस लावल्यामुळे जे सॅटलाईटमधून येणारी किरणं असतात ते त्याच्या आतील भागावर अदळतात आणि तेथेच राहातात. ज्यामुळे आपल्याला टीव्हीवरती सुंदर किंवा क्लिअर चित्र पाहाता येतं.

जर ही छत्री तिरकी नसेल, तर आपल्या टीव्हीवरती काहीच क्लिअर दिसणारच नाही. म्हणून त्याचं डिझाइन तसं बनवलं गेलं आहे.

मुळात तेथे एक फीड हॉर्न असतं, ज्याच्या मदतीने सिग्नल डीटीएच बॉक्सपर्यंत पोहोचतं.

छत्री सरळ ठेवल्यास काय होईल?

आता या DTH ची छत्री सरळ ठेवली तर काय होईल असा विचार तुमच्या मनात आला असेल? तर आम्ही तुम्हाला सांगतो की जर आपण DTH छत्री सरळ ठेवली तर येणारा किरण त्याच्या कॉनवेक्स पृष्ठभागावर आदळून पुन्हा मागे परावर्तित होतो. ज्यामुळे आपल्या टीव्हीवर आपल्याला काहीही दिसणार नाही.

First published:

Tags: Movie release, Top trending, Tv, Viral news