मुंबई 29 सप्टेंबर : बुधवारी म्हणजे 28 सप्टेंबरला Ask a Stupid Question Day होता, हा दिवस मुख्यता अमेरिकेत साजरा केला जातो. जो तेथील शिक्षक आणि विद्यार्थी साजरा करतात. हा दिवस भारतीय साजरा करत नसले तरी देखील. आपल्या भारतात लोक विचित्र आणि बिनकामाचे प्रश्न नक्कीच विचारतात. ज्याचं उत्तर बऱ्यादा खूपच मजेदार असतं. खरंतर आपल्या रोजच्या जीवनात आपण कधी कधी असे प्रश्न विचारतो की, त्याबद्दल नीट विचार केलात किंवा त्याला नीट ऐकलंत तर तुम्हालच ते ऐकून हसू आल्याशिवाय राहाणार नाही. चला हे मजेदार आणि विचित्र प्रश्न आणि त्यांची उत्तर जाणून घेऊ 1. जेव्हा खाण्यासाठी दुकानात गेल्यावर विचारतो, ‘गरम काय आहे?’ उत्तर : तेल लॉजिकली या प्रश्नाच्या उत्तराचा तुम्ही विचार केलात, तर त्याचं उत्तर तेल असेल. पण आपण अर्धाच प्रश्न विचारुन नेहमी त्याचा अर्थ बदलतो. 2. जेव्हा भाजीवाल्याला ग्राहक विचारतो, दादा भाजी कशी दिली? उत्तर : हाताने किंवा वजन करुन तुम्ही या प्रश्नात कुठेही किंमतीबद्दल तुम्ही विचारलं नाही. म्हणून लॉजिकली त्याचं उत्तर म्हणून तुम्हाला त्याची किंमत माहिती पडेलच असं नाही. परंतू काही भाजीवाले आता हुशार झाले आहेत. ते तुम्हाला त्याचं बरोबरच उत्तर देतील 3. जेव्हा भाजीवाल्याला ग्राहक विचारतो, मेथी कशीय? किंवा पालक कसंय? उत्तर : फारच सुंदर / एकदम मस्त बऱ्याचदा आपण कशी आहे किंवा कसा आहेस? हा प्रश्न तब्येतीची माहिती मिळवण्यासाठी करतो. परंतू हेच शब्द आपण भाजीची किंमत जाणून घेण्यासाठी वापरतो. जे फारच मनोरंजक आहे. पण बरेच भाजीवाले आपल्याला त्याचं उत्तर किंमतीतच देतात. 4. बऱ्याचदा आपण झोपलेल्या लोकांना काही ना काही कामासाठी उठवतो आणि विचारतो झोपलेलास का? उत्तर : नाही… मी फक्त डोळे बंद केले होते. बऱ्याचदा आपण झोपलेल्या लोकांना असे विचित्र प्रश्न विचारतो, ज्याचं उत्तर आपल्या प्रश्नातच असतं. पण आपण जास्त विचार न करता अशा मजेदार गोष्टी सहजच करुन जातो. 5. जेव्हा कोणी टॉयलेटमध्ये असतं, तेव्हा बाहेरुन कोणीतरी दरवाजा ठोकतो आणि विचारतो कोणी आहे का? उत्तर : नाही कोणीच नाही, तरी देखील आतून उगाच कडी लावली आहे. 6. जेव्हा आपल्या ओळखीचा व्यक्ती सिनेमा गृहात भेटतो आणि तो आपल्याला विचारतो. इथे काय करतोय? उत्तर : काही खास नाही, पाण्यात पोहोण्यासाठी आलोय 7. जेव्हा तुम्ही ओल्या केसांनी आई समोर येता आणि आई विचारते, अंघोळ केलीस का? उत्तर : नाही फक्त केस ओले करुन बाहेर आलोय. 8. जेव्हा लोक आपल्याला डिस्टर्ब करतात किंवा काम सांगतात आणि विचारतात तुला माझा त्रास होतोय का? उत्तर : नाही नाही अजिबात त्रास नाही, मला हे खूप आवडतं. 9. जेव्हा तुम्ही एखाद्याला विचारता, हा रस्ता कुठे जातो? उत्तर : त्या वाटेल तिकडे फिरुन येतो, सध्या इथे विश्रींतीसाठी थांबला आहे. रस्ता कधीच कुठे जात नसतो तो आपल्या जागेवरच असतो, पण लोकं त्याला आपल्या प्रश्नात फिरायला घेऊन जातात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.