• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • बापरे! साडेचार लाख रूपये किंमत; जाणून घ्या जगातील सर्वात महागड्या बर्गरची खासियत

बापरे! साडेचार लाख रूपये किंमत; जाणून घ्या जगातील सर्वात महागड्या बर्गरची खासियत

नेदरलँडच्या एका शेफनं एक असं बर्गर तयार केलं आहे ज्याची किंमत पाच हजार पाउंड म्हणजेच 4.50 लाख रूपये इतकी (World's Most Expensive Burger) आहे. या बर्गरमध्ये सोन्याचं पान लावण्याच आलं आहे

 • Share this:
  नवी दिल्ली 15 जुलै : फास्ट फूड (Fast Food) म्हणून बहुतेक लोक पिझ्झा, बर्गर, सँडविच, चिप्स आणि फ्रेंच फाईजसारख्या पदार्थांना पसंती देतात. भारतातील अनेक शहरांमध्ये बर्गर अगदी सहजपणे मिळतं. बरेचशे लोक संध्याकाळी बर्गर खाण्याला पसंती देतात. बर्गरच्या किमतीबद्दल (Burger Price) बोलायचं झालं तर हे यावर अवलंबून असतं, की तुम्ही ते खरेदी कुठून करत आहात. दिल्लीमध्ये (Delhi) अगदी दहा रुपयांपासून बर्गर मिळतं. मात्र, तुम्ही जर बर्गर किंगमधून (Burger King) हे खरेदी केलं तर तुम्हाला एका बर्गरसाठी 40 ते 50 रुपये खर्चावे लागतात. आज आम्ही तुम्हाला एका अशा बर्गरबाबत सांगणार आहोत, ज्याची किंमत ऐकूनच तुम्ही हैराण व्हाल. हे बर्गर सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. याच कारण आहे या बर्गरची किंमत. नेदरलँडच्या एका शेफनं एक असं बर्गर तयार केलं आहे ज्याची किंमत पाच हजार पाउंड म्हणजेच 4.50 लाख रूपये इतकी (World's Most Expensive Burger) आहे. या बर्गरमध्ये सोन्याचं पान लावण्याच आलं आहे, याच कारणामुळे याची किंमत इतकी जास्त आहे. VIDEO - याला कुणीतरी आवरा! नवरा-नवरीच्या मध्येच उभं राहून तरुण हे करतोय तरी काय? डी डॉल्टन्स नावाच्या रेस्टॉरंटमध्ये हे बर्गर उपलब्ध आहे. डी डॉल्टन्सनं आपल्या अधिकृत वेबसाईटवर या बर्गरबद्दलची विस्तृत माहिती दिली आहे. हे बर्गर द गोल्डन ब्वॉय नावानं प्रसिद्ध आहे. डी डॉल्टन्सचे मालक रॉबर्ट जे डि वीन यांनी हे बर्गर बनवलं आहे. याआधीच्या सर्वात महागड्या बर्गरविषयी बोलायचं झालं तर हा रेकॉर्ड अमेरिकेच्या ओरेगॉनच्या जूसीस ऑडटलॉ ग्रिलच्या नावावर होता. हे बर्गर 4200 पाउंड म्हणजेच 3 लाख 72 हजार रूपयात विकलं गेलं होतं. मात्र, द गोल्डन ब्वॉय बर्गरनं आता किमतीच्या बाबतीत या बर्गरलाही मागे सोडलं आहे. VIDEO- 6000 फूट उंच डोंगरावरून घेत होत्या झुला; उंचावर जाताच झोपाळा तुटला आणि... इतकं महाग का आहे हे बर्गर - या बर्गरच्या खासियतबाबत बोलायचं झालं तर यात सोन्याचं पान लावण्यात आलं आहे. यामुळे हे अधिक आकर्षक झालं आहे. ट्रफल, किंग क्रॅब, बेलुगा कॅवीआर, डक एक मायोनीज आणि डोम पेरिग्नॉम शॅम्पेन याचा वापर करून हे तयार केलं गेलं आहे. सध्या सोशल मीडियावर या बर्गरची भरपूर चर्चा रंगली आहे. लोक यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक हे बर्गर इतकं महाग असल्यानं सवाल उपस्थित करत आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: