मराठी बातम्या /बातम्या /Viral /

याला कुणीतरी आवरा रे! नवरा-नवरीच्या मध्येच उभं राहून तरुण हे करतोय तरी काय? VIDEO VIRAL

याला कुणीतरी आवरा रे! नवरा-नवरीच्या मध्येच उभं राहून तरुण हे करतोय तरी काय? VIDEO VIRAL

लग्नात नवरी-नवरीऐवजी या तरुणानंच सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

लग्नात नवरी-नवरीऐवजी या तरुणानंच सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

लग्नात नवरी-नवरीऐवजी या तरुणानंच सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 15 जुलै : लग्नात (Wedding) नवरा-नवरीशिवाय (Bride and groom) चर्चेत असतात ते नवरा-नवरीचे अतरंगी नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी. लग्नात (Wedding video) कुणी ना कुणी तरी एक अशी व्यक्ती असतेच जी सर्वांचं लक्ष वेधून घेते. सोशल मीडियावर (Social media) लग्नातील (Wedding video viral) अशा व्यक्तीचे व्हिडीओ व्हायरल (Viral video) होत असतात. आता अशाच एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्याने स्टेजवर नवरा-नवरीच्या मध्येच जाऊन विचित्र कृत्य केलं आहे. लग्नात तरुणाने जे केलं ते पाहून तुम्हाला शॉकच बसेल. याला कुणीतरी आवरा रे, असंच तुमच्या तोंडातूनही निघेल. लग्नात नवरी-नवरीऐवजी या तरुणानंच सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
View this post on Instagram

A post shared by PATNA in HD (@patnahd)

व्हिडीओत पाहू शकता. नवरा-नवरी स्टेजवर उभे आहेत. त्यांचं फोटोसेशन सुरू आहे. इतक्यात एक तरुण स्टेजवर येतो. हे वाचा - VIDEO - नवरीचे नखरे पाहून नवऱ्याची सटकली; भरमांडवात जे केलं ते पाहून वऱ्हाडी शॉक तरुणाच्या हातात पैशांच्या नोटांचं बंडल आहे. सुरुवातीला तो नवरीभोवती पैसे ओवाळतो त्यानंतर नवऱ्याभोवती पैसे ओवाळतो आणि मग दोघांच्याही मध्येच उभा राहतो. त्यानंतर हातवारे करतो. त्याचे हातवारेही विचित्र असतात. त्यानंतर हातातलं नोटाचं बंडल नवऱ्याच्या मागच्या बाजूने फेकून तिथून बाजूला होतो. स्टेजवर थोडा पुढे येऊन थेट कॅमेऱ्याच्या समोरच तो उभा राहतो आणि हातवारे करत, वेगवेगळ्या पोझ देण्याचा प्रयत्न करतो. तरुणाला असं करताना पाहून नवरदेवालाही आपलं हसू आवरत नाही. हे वाचा - नवरीचा हात हातात धरताच थरथर कापू लागला; लग्नाआधीच नवरदेवाची काय झाली अवस्था पाहा patnahd इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तरुणाच्या या विचित्र वागण्याला स्वॅग असं म्हणण्यात आलं आहे. पण हा असा कसला स्वॅग अशाच काहीशा प्रतिक्रिया हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर उमटत आहेत. नेटिझन्ससुद्धा या विचित्र तरुणावर कमेंट करून त्याची चांगलीच मजा घेत आहेत.
First published:

Tags: Funny video, Viral, Viral videos, Wedding video

पुढील बातम्या