मराठी बातम्या /बातम्या /Viral /

6000 फूट उंच डोंगराच्या कडेवरून घेत होत्या झुला; उंचावर जाताच झोपाळा तुटला आणि... काळजाचा ठोका चुकवणारा Shocking video

6000 फूट उंच डोंगराच्या कडेवरून घेत होत्या झुला; उंचावर जाताच झोपाळा तुटला आणि... काळजाचा ठोका चुकवणारा Shocking video

उंचावर असलेल्या झोपाळ्यावर बसून अधिक उंच उडण्याच्या हौसेपोटी दोन महिलांनी आपला जीव धोक्यात घातला.

उंचावर असलेल्या झोपाळ्यावर बसून अधिक उंच उडण्याच्या हौसेपोटी दोन महिलांनी आपला जीव धोक्यात घातला.

उंचावर असलेल्या झोपाळ्यावर बसून अधिक उंच उडण्याच्या हौसेपोटी दोन महिलांनी आपला जीव धोक्यात घातला.

  • Published by:  Priya Lad

मॉस्को, 14 जुलै : झोपाळ्यावर (Swing) बसून उंच उंच उडायला कुणाला आवडत नाही. प्रत्येकाला वाटतं आपण झोपाळ्यावर बसून उंच उडावं. पण काही लोकांना तर यापुढेही जाऊन उंचावर असलेल्या झोपाळ्यावर बसून अधिक उंच उडण्याची हौस असते. अशाच हौसेपोटी दोन महिलांनी आपला जीव धोक्यात घातला. हजारो फूट उंचावर असलेल्या झोपाळ्याचा आनंद (Swing from 6500 feet height) त्या लुटायला गेला आणि झोपाळाच (Women fall from swing) तुटला. काळजाचा ठोका चुकवणारा (Shocking video) हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Scoial media) व्हायरल (Viral video) होतो आहे.

रशियातील (Russia) एका 6000 फूट उंच डोंगरावर झोपाळा (Russia swing)  बांधण्यात आला आहे. या झोपाळ्यावर झुलण्यासाठी अनेक पर्यटक येतात. अशाच दोन महिलासुद्धा या झोपाळ्याचा आनंद घेण्यासाठी म्हणून बसल्या. पण त्यांच्यासोबत अशी दुर्घटना घडली की कदाचित या डोंगरावरील काय साध्या जमिनीवरील झोपाळ्यावरही बसायची कदाचित हिंमत करणार नाही.

अंकल रँडम ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता, अगदी डोंगराच्या कडेवर हा लांब आणि मोठा असा झोपाळा आहे. त्यावर दोन महिला अगदी उत्साहात बसतात. मागून त्यांना झोके देण्यासाठी एक व्यक्ती आहे. झोका देताच तो डोंगराच्या अगदी पुढे जातो म्हणजे झोपाळ्यावर झुलताना खाली पाहिलं तर खोल दरी आणि वर उंच आकाशात आणि त्याच्यामध्ये झोपाळ्यातून हवेत उडण्याचा अद्भुत आनंद आणि हो. सोबतच तितकी भीतीसुद्धा. ज्या भीतीचा आवाज या महिलांनी झोका घेताच स्पष्टपणे ऐकू येतोच. पण फक्त हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्या काळजातूनही जाणवतो.

हे वाचा - पळून पळून किती पळणार! अशा ठिकाणी दिली कोरोना लस ज्याचा कुणी विचारही केला नसेल

महिलांना झोके घेताना पाहून हा झोपाळा तुटला तर असा विचारही काही क्षण मनात येतो आणि हे काय! खरंच झुलता झुलता झोपाळा एका बाजूने तुटतो आणि झोपाळ्यावरील महिला धाडकन खाली कोसळतात. व्हिडीओ पाहून आपल्या काळजाची धडधडही वाढली. त्या महिलांचा काय झालं असेल, त्या काही वाचल्या नसतील. इतक्या उंचावरून पडून काय त्यांचा जीव वाचणार, अशीच भीती आपल्याही मनात निर्माण होते.

हे वाचा - OMG! शिजवायला गेली अंडं पोळून निघाला चेहरा; ऑनलाईन रेसिपी फंडा पडला महागात

पण सुदैवाने  झोपाळा डोंगरापासून फार दूर नव्हता डोंगराच्या अगदी कडेवरच तुटला. महिलांचं नशीब बलवत्तर म्हणून त्यामुळे महिलांचा जीव वाचला. त्यांना दुखापत झाली आहे.

First published:

Tags: Shocking viral video, Viral, Viral videos