मुंबई, 12 सप्टेंबर : क्रिकेटच्या मैदानात मॅच रंगात असताना कधी-कधी अशा गोष्टी घडतात की त्यावेळी दोन्ही टीमच्या खेळाडूंचं मनोरंजन होते. असाच एक प्रकार नुकताच पाहयला मिळाला. यामध्ये मैदानातील बॉलचा ताबा हा फिल्डर किंवा बॉलरनं नाही तर कुत्र्यानं घेतला. बॉल तोंडात घेऊन हा कुत्रा मैदानात पळू लागला. त्यानं सर्व खेळाडूंना त्याच्या मागं पळवलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. आयर्लंडमधील (Ireland) ब्रेडी क्रिकेट क्लबच्या मैदानात हा प्रकार घडला. ब्रेडी क्रिकेट क्लब आणि सीएसएनआय यांच्यात झालेल्या मॅचमध्ये एक कुत्रा मैदानात आला आणि बॉल घेऊन पळाला. मॅचमधील 9 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. पावसामुळे ही मॅच 12 ओव्हर्सची निश्चित करण्यात आली होती. 9 व्या ओव्हरमध्ये एबी लेकीनं फटका मारला आणि ती रन काढण्यासाठी धावली. त्यावेळी विकेट किपर रिचेलनं ओव्हर तिला रन आऊट करण्याच्या प्रयत्नात ओव्हर थ्रो केला. रिचेलचा थ्रो कोणत्या फिल्डरनं पकडण्याच्या आधीच कुत्र्यानं बॉल तोंडात पकडला आणि तो मैदानात पळत सुटला. त्यानंतर मैदानातील फिल्डर्ससह एक प्रेक्षक देखील कुत्र्याला पकडण्यासाठी मैदानात पळत होता. अखेर नॉन स्ट्रायकरला उभी असलेली बॅटर फिशरनं कुत्र्याला पकडलं.
🐶 Great fielding…by a small furry pitch invader!@ClearSpeaks #AIT20 🏆 pic.twitter.com/Oe1cxUANE5
— Ireland Women’s Cricket (@IrishWomensCric) September 11, 2021
आयर्लंडच्या महिला क्रिकेटमधील मॅचचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

)







