तुम्ही पाहू शकता की हा साप त्याच्या पाठीवर तसंच डोक्यावर जात आहे. हैराण करणारी बाब म्हणजे या मुलाच्या चेहऱ्यावर जराही भीती दिसत नाही. उलट हा मुलगा सापाला हातात घेऊन त्याच्यासोबत खेळत आहे. साप म्हणजे एखादं खेळणं असल्याप्रमाणे तो त्याच्यासोबत खेळत राहातो. हे पाहून कोणाच्याही काळजाचे ठोके चुकतील. हे दृश्य खरोखरच हैराण करणारं आहे. लहान मुलगा आणि सापाचा हा हैराण करणारा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर snake._.world नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. 14 जानेवारीला अपलोड झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत 28 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. हा आकडा वाढतच आहे. अनेकांनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून यूजर्स भडकले आहेत. लोकांचं असं म्हणणं आहे की साप एखादं खेळणं नाही, जे तुम्ही मुलांच्या हातात द्याल. आई-वडिलांनी मुलांच्या बाबतीत अधिक जबाबदार व्हायला हवं. पाण्यात कोसळलेल्या साथीदाराला वाचवण्यासाठी श्वानाची धडपड; शेवटी काय घडलं? Video एका यूजरचं असं म्हणणं आहे, की मला वाटतंय हा ग्रीन ट्री बोआ साप आहे. हे साप चावणारे असतात आणि एका मुलाला अशाप्रकारे सापासोबत खेळायला लावणं चुकीचं आहे. तसंही साप खेळायची वस्तू नाही. दुसऱ्या एका यूजरनं या मुलाबाबत काळजी व्यक्त करत लिहिलं, आई-वडिलांनी इतकं बेजबाबदार असू नये. हा साप विषारी नसला तरी मुलाला चावू शकतो. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.