कोंबडीला हे समजलेलं असतं की साप तिची अंडी खाण्यासाठी तिथे आलेला आहे. यामुळे अंड्याच्या बचावासाठी कोंबडी त्याच्यावरच बसून सापावर हल्ला करू लागते. अनेकदा ती सापावर चोचीने वार करते. आपल्या चोचीने सतत हल्ला करत कोंबडी सापाला तिथून दूर करण्याचा प्रयत्न करते. मात्र सापही कोंबडीच्या समोरच थांबतो आणि हल्ला करत राहातो. मात्र, कोंबडीही हार न मानता चोचीने त्याला तोपर्यंत मारत राहाते, जोपर्यंत हा साप तिथून निघून जात नाही. VIDEO: नवरी-नवरदेवाच्या मांडीवर कोसळला युवक; भडकलेल्या नवरदेवाने काय केलं पाहा हा व्हिडिओ hayatvahsh2019 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केला गेला आहे. व्हिडिओ व्हायरल होत असून लोक यातील कोंबडीच्या धाडसाचं कौतुक करत आहेत. तसंच आपल्या अंड्यांचं संरक्षणासाठी तिने शेवटपर्यंत दिलेल्या लढ्याबाबतही आश्चर्य व्यक्त करत आहेत. तर काही लोक हे पाहून हैराण आहेत, की इतक्या विषारी सापालाही कोंबडीने हार मानण्यास भाग पाडलं. एका यूजरने यावर कमेंट करत लिहिलं, आम्ही कधीही विचार केला नव्हता की साप आणि कोंबडी यांच्यातही भांडण होऊ शकतं.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking video viral, Snake video