मराठी बातम्या /बातम्या /Viral /मोडून पडला संसार पण...! सर्वकाही गमावल्यानंतर 100 रुपयात उभारला व्यवसाय, तिच्या जिद्दीची कहाणी

मोडून पडला संसार पण...! सर्वकाही गमावल्यानंतर 100 रुपयात उभारला व्यवसाय, तिच्या जिद्दीची कहाणी

आपल्या कुटुंबाची मतं घेऊन, संपूर्ण बचतीची जुळवाजुळव करून 50 लाख रुपयांचं कर्ज घेतलं. यातून त्यांनी 2010 मध्ये एक सुपरमार्केट सुरू केलं. 50 लोक त्यांच्याकडे काम करत होते. पण 2011 मध्ये त्यांच्या स्टोअरमध्ये चोरी झाली.

नवी दिल्ली, 16 जानेवारी : एखादा व्यक्ती मेहनतीने सर्व काही उभारतो, बनवतो आणि ते एका क्षणात चोरी झाल्यास काय अवस्था होईल? पण कोणत्याही परिस्थितीत खंबीर उभं राहणं, हेच खरं महत्त्वाचं आहे. असंच काहीस झालंय तमिळनाडूमध्ये राहणाऱ्या Elavarasi Jayakanth यांच्यासोबत. सध्या त्या केरळमधील थ्रिसूरमध्ये राहतात. त्यांची कहाणी अतिशय संघर्षमय आणि तितकीचं प्रेरणादायीही आहे.

aswathyhotchips नुसार, Elavarasi यांच्या कुटुंबाचा मिठाईचा व्यवसाय होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर Elavarasi यांनी लग्न केलं आणि आपल्या कुटुंबाचंच मिठाईचं काम सुरू केलं. आपल्या कुटुंबाकडूनच त्यांनी मिठाई बनवण्याबाबत समजून घेतलं, त्यानंतर लोकल स्टोर्समध्ये ते विक्री करण्यास सुरुवात केली.

(वाचा - COVID-19 Vaccination: लस घेतल्यानंतरही सावध राहा; वैज्ञानिकांनी दिला इशारा)

2011 मध्ये चोरी -

द बेटर इंडियानुसार, त्यांनी आपल्या कुटुंबाची मतं घेऊन, संपूर्ण बचतीची जुळवाजुळव करून 50 लाख रुपयांचं कर्ज घेतलं. यातून त्यांनी 2010 मध्ये एक सुपरमार्केट सुरू केलं. 50 लोक त्यांच्याकडे काम करत होते. पण 2011 मध्ये त्यांच्या स्टोअरमध्ये चोरी झाली आणि त्यांनी जे कमावलं होतं ते सर्व गमावलं.

(वाचा - सावधान! तुम्हालाही हा मेसेज आलाय का? गृह मंत्रालयाकडून फसवणुकीबाबत अलर्ट जारी)

पण त्यानंतरही त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी स्वत:ला आणि आपल्या व्यवसायालाही पुन्हा उभं केलं. Aswathi Hot Chips नावाने त्यांनी पुन्हा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय त्यांनी केवळ 100 रुपयांपासून सुरू केला होता. आज थ्रिसूरमध्ये त्यांच्या Aswathi Hot Chips चे चार आउटलेट आहेत. यात वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स, लोणची आणि केक मिळतात. त्यांची हीच मेहनत पाहता त्यांना International Peace Council UAE Award 'Best Entrepreneur' मिळाला आहे. एखाद्याने जिद्दीने, मेहनतीने करायचं ठरवलं की, त्याला कोणीही थांबवू शकत नाही, त्यात यशस्वी होता येतं, हेच Elavarasi यांनी सिद्ध केलं आहे.

First published:

Tags: Kerala